जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२-८ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २२-२३
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ८५३ परि. ५-६
भविष्यात पाहण्याची आणि भविष्यातल्या गोष्टींना आधीच निश्चित करण्याची ताकद
भविष्यात पाहण्याच्या क्षमतेचा निवडकपणे वापर. बायबलच्या बऱ्याच अहवालांचं परिक्षण केल्यावर असं दिसून येतं की जेव्हा-जेव्हा एखादी घटना घडली, तेव्हा त्या वेळच्या परिस्थितीचं परिक्षण करून देवाने योग्य तो निर्णय घेतला. यावरून आपण हे समजू शकतो, की जेव्हा देव भविष्यात पाहण्याच्या आपल्या ताकदीचा वापर करतो, तेव्हा ते नेहमी त्याच्या नैतिक स्तरांच्या आणि त्याच्या वचनात त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जे सांगितलं आहे, त्याच्याशी जुळणारं असतं.
जसं की, उत्पत्ति ११:५-८ मध्ये असं सांगितलं आहे, की देवाने पहिल्यांदा हे पाहिलं कि काही लोक बाबेलमध्ये त्याच्या इच्छेविरूद्ध कार्य करत आहेत. आणि मग त्यांचं काम बंद पाडण्यासाठी त्याने पाऊल उचललं. तसंच सदोम आणि गमोरामध्येसुद्धा जेव्हा दुष्टपणा वाढला तेव्हाही यहोवा अब्राहामला म्हणाला, की “त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.” (उत्प १८:२०-२२; १९:१) आणखी एक उदाहरण म्हणजे, अब्राहामविषयी बोलताना देव म्हणाला की मी त्याची ‘ओळख करून घेतली आहे.’ अब्राहाम इसहाकचं अर्पण करणार इतक्यात यहोवाने त्याला अडवलं आणि म्हटलं: “तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही, यावरुन तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”—उत्प १८:१९; २२:११, १२ ची तुलना नहे ९:७, ८; गल ४:९ सोबत करा.
सेवाकार्यासाठी तयार व्हा
इन्साइट-१ पृ. ६०४ परि. ५
येशूचा मृत्यू होण्याआधीच अब्राहामला नीतिमान कसं काय ठरवण्यात आलं?
अब्राहामच्या विश्वासामुळे आणि त्याच्या कार्यांमुळे ‘त्याला नीतिमान ठरवण्यात आलं.’ (रोम ४:२०-२२) याचा अर्थ असा होत नाही की अब्राहाम किंवा येशूच्या आधी हयात असणारे विश्वासू लोक परिपूर्ण होते. पण तरी देवाने त्यांना जगातल्या लोकांसारखं अनीतिमान ठरवलं नाही. तर देवाच्या नजरेत ते निर्दोष होते. (स्तो ३२:१, २; इफि २:१२) कारण देवाने अभिवचन दिलेल्या ‘संततीवर’ त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या. (उत्प ३:१५; स्तो ११९:२, ३) अशा प्रकारे, स्वतःच्या परिपूर्ण न्यायिक स्तरांशी तडजोड न करता या अपरिपूर्ण मानवांसोबत नातेसंबंध ठेऊन त्यांना आशीर्वाद देणं यहोवाला शक्य होतं. (स्तो ३६:१०) पण त्याच वेळी यहोवाच्या या विश्वासू सेवकांनाही याची जाणीव होती की पापापासून मुक्त होण्यासाठी त्यांना खंडणीची गरज आहे आणि म्हणूनच ते त्यासाठी असणाऱ्या देवाच्या नियुक्त वेळेची वाट पाहत राहिले.—स्तो ४९:७-९; इब्री ९:२६.
९-१५ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २४
“इसहाकसाठी एक पत्नी शोधणं”
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ३
“हो, मी तयार आहे”
अब्राहामने अलियेजरला अशी शपथ घ्यायला लावली की तो इसहाकसाठी कोणतीही कनानी मुलगी बघणार नाही. याचं काय कारण होतं? कारण कनानी लोक यहोवाची उपासना तर करत नव्हतेच, पण त्याचा आदरही करत नव्हते. अब्राहामला माहीत होतं की यहोवा योग्य वेळी त्यांनी केलेल्या वाईट कामांची त्यांना शिक्षा देईल. त्यामुळे इसहाकने त्यांच्या अनैतिक चालीरितींशी किंवा त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये अशी अब्राहामची इच्छा होती. तसंच, देवाने दिलेली अभिवचनं पूर्ण करण्यात त्याची एक महत्त्वाची भूमिका असेल हेसुद्धा अब्राहामला माहीत होतं.—उत्पत्ति १५:१६; १७:१९; २४:२-४.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ४
“हो, मी तयार आहे”
अलियेजरने रिबकाच्या घरच्यांना काय काय झालं ते सांगितलं. जेव्हा तो हारानच्या विहिरीजवळ पोचला तेव्हा त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली, की त्याने इसहाकसाठी योग्य असलेली मुलगी त्याला दाखवून द्यावी. त्याने अशी विनंती केली की ज्या मुलीला यहोवाने निवडलं आहे तिने विहिरीजवळ यावं आणि पाणी मागितल्यावर त्यालाच नाही तर त्याच्या उंटांनाही पाणी पाजावं. (उत्पत्ति २४:१२-१४) मग अलियेजरच्या प्रार्थनेप्रमाणे विहिरीजवळ रिबका आली. विचार करा, जर अलियेजरने तिच्या घरच्यांना सांगितलेली ही गोष्ट तिच्या कानावर पडली असती, तर तिला कसं वाटलं असतं!
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ६-७
“हो, मी तयार आहे”
काही आठवड्यांआधी अलियेजरने अब्राहामला असा प्रश्न केला होता, की जर ती मुलगी माझ्यासोबत आली नाही तर? तेव्हा अब्राहामने त्याला म्हटलं की मग “तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.” (उत्पत्ति २४:३९, ४१) त्या काळातही बथुवेलच्या घराण्यात मुलीच्या आवडीनिवडीचा विचार केला जायचा. अलियेजरवर सोपवलेल्या या कामगिरीत त्याला यश आल्यामुळे तो इतका खूश झाला की त्याने दुसऱ्या दिवशीच सकाळी रिबकाला कनानला घेऊन जायची विनंती केली. पण तिने कमीतकमी दहा दिवस तरी आपल्यासोबत राहावं अशी तिच्या घरच्यांची इच्छा होती. म्हणून मग शेवटी त्यांनी असं म्हटलं, की “आम्ही मुलीस बोलवून ती काय म्हणते ते विचारू.”—उत्पत्ति २४:५७.
आता रिबकाला तिच्या जीवनातला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. वडिलांनी आणि तिच्या भावाने केलेल्या विनंतीच्या आधारवर अलियेजरसोबत अनोळखी देशात जायचं तिने टाळलं का? की तिने या सर्व घटनांच्या मागे यहोवाचा हात आहे हे ओळखून, हा आपल्यासाठी एक बहुमान आहे, असं तिने मानलं? तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या या मोठ्या वळणाबद्दल तिच्या काय भावना होत्या हे तिच्या उत्तरावरून स्पष्ट होतं. तिने म्हटलं, “हो, मी तयार आहे.”—उत्पत्ति २४:५८, NW.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १२-१३
“हो, मी तयार आहे”
एके संध्याकाळी रिबका विहिरीतून पाणी काढत असताना एक वृद्ध माणूस धावत तिच्याजवळ आला. त्याने तिला नम्रपणे विनंती करत म्हटलं, ‘तुझ्या घागरीतलं थोडं पाणी मला पाज.’ तो माणूस लांबून प्रवास करून आला आहे, हे तिने पाहिलं. मग तिने पटकन आपल्या खांद्यावरची घागर उतरवून त्या माणसाला तहान भागेपर्यंत थंडगार पाणी दिलं. तिने हेसुद्धा पाहिलं की त्याचे दहा उंटही तिथे जवळच बसले होते आणि त्यांच्यासाठी असलेला पाण्याचा हौदसुद्धा कोरडा होता. तो माणूस तिच्याकडे अपेक्षेने पाहत होता, आणि तिलाही त्याची अगदी उदारपणे मदत करायची होती. त्यामुळे ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.”—उत्पत्ति २४:१७-१९.
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रिबकाने त्या उंटांना फक्त एकदाच पाणी पाजलं नाही तर त्यांची तहान भागेपर्यंत त्यांना पाणी पाजलं. आणि एक तहानलेला उंट एका वेळेस जवळ-जवळ ९५ लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ शकतो! जर ते दहाही उंट तहानलेले असते तर विचार करा तिला किती मेहनत घ्यावी लागली असती. पण असं दिसतं की ते उंट जास्त तहानलेले नव्हते. पण ही गोष्ट रिबकाला माहीत नव्हती. त्या अनोळखी वृद्ध माणसाचा पाहुणचार करायला ती उत्सूक होती म्हणून ती मनापासून मेहनत करायला तयार होती. आणि त्यानेही तिला अडवलं नाही. तो तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिला आणि ती पुन्हा-पुन्हा घागरीने पाणी ओढत, त्या हौदात ओतत राहिली.—उत्पत्ति २४:२०, २१.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १५ परि. ३
“हो, मी तयार आहे”
शेवटी, या लेखाच्या सुरूवातीला उल्लेख केलेला दिवस उजाडला. ते नेगेबला पोचेपर्यंत दिवस मावळला होता. तेव्हा रिबकाने विचारत गुंग असलेल्या एका माणसाला रानात फिरत असताना पाहिलं. उंट खाली बसण्याआधीच ती उंटावरून पटकन खाली उतरली आणि तिने आपल्या सेवकाला विचारलं, की ‘हा समोरून येणारा माणूस कोण आहे?’ जेव्हा तिला समजलं की तो इसहाक आहे तेव्हा तिने आपलं डोकं बुरख्याने झाकलं. (उत्पत्ति २४:६२-६५) तिने असं का केलं असावं? आपल्या होणाऱ्या पतीला आदर दाखवण्यासाठी तिने असं केलं असावं. आज काहींना असं वाटू शकतं की अशा प्रकारची अधीनता दाखवणं जुनाट विचार आहेत. पण खरं पाहिलं तर आज आपल्यापैकी प्रत्येकालाच, मग ती स्त्री असो किंवा पुरूष, रिबकाकडून नम्रतेचा गुण शिकायला मिळतो. आपल्यापैकी सगळ्यांनाच हा सुंदर गुण विकसित करण्याची गरज आहे.
१६-२२ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २५-२६
“एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो”
इन्साइट-१ पृ. ८३५
प्रथमपुत्र
बायबल काळात प्रथमपुत्राला कुटुंबामध्ये महत्त्वाचं स्थान असायचं आणि तोच नंतर कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळायचा. शिवाय, प्रथमपुत्राला वडिलांच्या संपत्तीचा दुप्पट वाटासुद्धा मिळायचा. (अनु २१:१७) प्रथमपुत्राच्या हक्काप्रमाणे योसेफने रऊबेनला जेवणाच्या पंक्तीत पहिल्या जागेवर बसवलं. (उत्प ४३:३३) बायबलमध्ये प्रथमपुत्रांचा उल्लेख नेहमीच पहिला येतो असं नाही. उलट बहुतेक वेळा ज्या लोकांची देवाच्या उद्देशात महत्त्वाची भूमिका होती किंवा जे यहोवाला विश्वासू होते, त्यांना जास्त महत्त्व देण्यात आलंय.—उत्प ६:१०; १इत १:२८; यांची तुलना उत्प ११:२६, ३२; १२:४ सोबत करा.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. २४५ परि. ६
खोटं
बायबल मुद्दामहून खोटं बोलण्याच्या विरोधात आहे. पण म्हणून चुकीच्या व्यक्तीला गरज नसतानाही सगळी खरीखुरी माहिती सांगितली पाहिजे असा याचा अर्थ होत नाही. येशूने असा सल्ला दिला की “पवित्र गोष्टी कुत्र्यांना देऊ नका आणि तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. नाहीतर, ते त्यांना पायांखाली तुडवतील आणि उलटून तुमच्यावर हल्ला करतील.” (मत्त ७:६) म्हणून येशूनेसुद्धा काही वेळा त्याच्या विरोधकांना पूर्ण माहिती द्यायचं टाळलं किंवा त्यांच्या प्रश्नांचं थेट उत्तर दिलं नाही. कारण त्यामुळे विनाकारण समस्या निर्माण झाली असती. (मत्त १५:१-६; २१:२३-२७; योह ७:३-१०) याच दृष्टीकोनातून अब्राहाम, इसहाक, राहाब आणि अलीशा यांनी जे केलं ते आपण समजू शकतो. त्यांनीसुद्धा पुढे येणारी समस्या ओळखून यहोवाची उपासना न करणाऱ्या लोकांची दिशाभूल केली किंवा त्यांना पूर्ण माहिती दिली नाही.—उत्प १२:१०-१९; अध्या. २०; २६:१-१०; यहो २:१-६; याक २:२५; २रा ६:११-२३.
२३-२९ मार्च
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २७-२८
“याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो”
टेहळणी बुरूज०७-E १०/१ पृ. ३१ परि. २-३
वाचकांचे प्रश्न
रिबका आणि याकोब असं का वागले याबद्दल बायबलमध्ये सविस्तर माहिती दिलेली नाही. पण त्यांच्यासमोर ही परिस्थिती अचानक निर्माण झाली हे मात्र बायबल आपल्याला सांगतं. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी जे केलं, ते चुकीचं होतं की बरोबर होतं, याबद्दल बायबल काहीही सांगत नाही. त्यामुळे खोटं बोलणं किंवा एखाद्याची दिशाभूल करणं चालू शकतं, असा निष्कर्ष आपण यातून काढू नये. पण त्यांनी असं का केलं असावं हे समजून घ्यायला बायबल आपली मदत करतं.
या अहवालातून सगळ्यात पहिली गोष्टी ही समजते की वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादावर एसावचा नाही तर याकोबचा हक्क होता. आणि काही काळाआधी याकोबने प्रथमपुत्राचा हक्क कायदेशीरपणे आपला भाऊ एसाव याच्याकडून विकत घेतला होता. कारण एक वेळच्या जेवणासाठी एसावने आपला हक्क याकोबला विकला होता. बायबल त्याच्याविषयी असं म्हणतं, की “एसावने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला.” (उत्पत्ति २५:२९-३४) त्यामुळे असं म्हणता येईल की आपल्या हक्काचेच आशीर्वाद घेण्यासाठी याकोब आपल्या वडिलांकडे गेला होता.
इन्साइट-१ पृ. ३४१ परि. ६
आशीर्वाद
बायबल काळात एक कुलपिता सहसा आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्या मोठ्या मुलाला आशीर्वाद द्यायचा. त्या काळात या गोष्टीला खूप महत्त्व होतं. इसहाक आता वृद्ध झाला होता आणि त्याला आता नीट दिसतही नव्हतं. म्हणून मरण्याआधी इसहाकने, याकोबला तो आपला पहिला पुत्र एसाव आहे असं समजून आशीर्वाद दिला. आणि नकळतपणे, एसावपेक्षा याकोबला जास्त आशीर्वाद आणि समृद्धी मिळावी अशी विनंती त्याने यहोवाला केली. (उत्प २७:१-४, २३-२९; २८:१, ६; इब्री ११:२०; १२:१६, १७) नंतर जेव्हा त्याला कळलं की तो एसाव नाही तर याकोब होता, तेव्हा त्याने पुन्हा याकोबला बोलवून आशीर्वाद दिला व त्याला आणखी माहिती दिली. (उत्प २८:१-४) मरण्याआधी याकोबने आधी योसेफच्या दोन मुलांना आशीर्वाद दिले आणि नंतर आपल्या मुलांना दिले. (उत्प ४८:९, २०; ४९:१-२८; इब्री ११:२१) तसंच, मोशेनेही मरण्याअगोदर इस्राएल राष्ट्राला आशीर्वाद दिला होता. (अनु ३३:१) या सगळ्या उदाहरणांमध्ये दिलेले आशीर्वाद एका अर्थाने भविष्यवाण्याच होत्या.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज०६-HI ४/१५ पृ. ६ परि. ३-४
अपने साथी से बात करने के लिए क्या ज़रूरी है?
हम कैसे कह सकते हैं कि इसहाक और रिबका ने अपनी बात अच्छी तरह कहने और एक-दूसरे को समझने का हुनर बढ़ाया था? जब उनके बड़े बेटे एसाव ने हित्ती जाति की दो लड़कियों से शादी की, तो उनके परिवार में कलह मच गयी। रिबका इसहाक से बार-बार कहती रही: “मैं हित्ती लड़कियों के साथ रहते रहते उकता गई हूं! यदि याकूब [उनका छोटा बेटा] भी . . . किसी हित्ती लड़की से विवाह कर लेता है, तब मेरे जीवन में मुझे कौन-सा सुख मिलेगा?” (उत्पत्ति २६:३४; २७:४६) ज़ाहिर है, रिबका ने साफ शब्दों में अपनी परेशानी इसहाक को बतायी।
इसहाक ने अपने दूसरे बेटे, याकूब को आज्ञा दी कि वह किसी कनानी लड़की से शादी न करे। (उत्पत्ति २८:१, २) इससे पता चलता है कि इसहाक ने रिबका की बात को अच्छी तरह समझा और फिर ज़रूरी कदम उठाया। इस जोड़े ने अपने परिवार के एक बहुत ही नाज़ुक मसले पर बात करने और एक-दूसरे की बात समझने में कामयाबी पायी। यह हमारे लिए एक बहुत बढ़िया मिसाल है। लेकिन अगर पति-पत्नी किसी मसले पर एक-दूसरे से सहमत नहीं होते, तब क्या किया जा सकता है?
३० मार्च–५ एप्रिल
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २९-३०
“याकोब लग्न करतो”
टेहळणी बुरूज०७-E १०/१ पृ. ८-९
“इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या” दोन दुःखी बहिणी
लेआने याकोबला फसवण्यासाठी कट रचला होता का? का ती फक्त आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करत होती? आणि या वेळी राहेल कुठे होती? काय चाललंय, हे तिला माहित होतं का? जर तिला माहित होतं तर तिला कसं वाटलं असेल? ती तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध वागली असती का? बायबलमध्ये या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. राहेल आणि लेआला याबद्दल काहीही वाटत असलं तरी याकोब मात्र नंतर खूप चिडला. आणि त्याने आपला राग मुलींवर नाही तर लाबानवर काढला. तो त्याला म्हणाला: “मी राहेलसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?” तेव्हा लाबान म्हणाला: “वडील मुलीच्यापूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” (उत्प २९:२५-२७) अशा प्रकारे, याकोबला नाईलाजाने दोन पत्नी कराव्या लागल्या, ज्याचा परिणाम पुढे वाईट होणार होता कारण यामुळे त्या दोन्ही बहिणींमध्ये ईर्ष्या निर्माण होणार होती.
इन्साइट-२ पृ. ३४१ परि. ३
विवाह
सोहळा, समारंभ. इस्राएलमध्ये लग्नसमारंभाच्या काही खास चालीरिती नव्हत्या, पण मोठ्या आनंदात हा सोहळा साजरा केला जायचा. लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी खूप तयारी करायची. सर्वात आधी ती अंघोळ करून सुगंधी तेल लावायची. (रूथ ३:३ ची तुलना यहे २३:४० सोबत करा.) मग नक्षीकाम केलेली तागाची तलम वस्त्रं तिला घातली जायची. (यिर्म २:३२; प्रक १९:७, ८; स्तो ४५:१३, १४) आणि वेगवेगळ्या दागदागिन्यांनी तिला सजवलं जायचं. (यश ४९:१८; ६१:१०; प्रक २१:२) यासोबतच तिला डोक्यापासून पायापर्यंत एक जाळीदार कपड्याचा बुरखा घातला जायचा. (यश ३:१९, २३) यावरून आपल्याला कळू शकतं की राहेलच्या बदल्यात लेआला देऊन याकोबला फसवणं, लाबानसाठी किती सोपं होतं.—उत्प २९:२३, २५.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ५०
दत्तक घेणं
याकोबला मुलं व्हावीत म्हणून राहेल आणि लेआ यांनी याकोबला आपल्या दासी दिल्या. आणि या दासींना झालेली मुलं जणू आपल्या “मांडीवर प्रसुत” झाली आहेत असं समजून त्यांनी या मुलांना आपलीच मुलं समजलं. (उत्प ३०:३-८, १२, १३, २४) राहेल आणि लेआ यांना झालेल्या मुलांसोबत त्या मुलांनाही वारसाहक्क होता. या मुलांवर राहेल आणि लेआ यांचा पूर्ण अधिकार होता कारण त्यांचा बाप याकोब होता आणि ज्यांच्यापासून ती जन्मली होती त्या त्यांच्या दासी होत्या.