वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr19 नोव्हेंबर पृ. १
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
  • उपशिर्षक
  • ४-१० नोव्हेंबर
  • ११-१७ नोव्हेंबर
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
mwbr19 नोव्हेंबर पृ. १

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

४-१० नोव्हेंबर

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ८६२ परि. ५

क्षमा

इतरांच्या वतीने, इतकंच काय तर संपूर्ण मंडळीच्या वतीने प्रार्थनेत माफी मागणं चांगली गोष्ट आहे. मोशेने इस्राएल राष्ट्राच्या वतीने यहोवाकडे त्यांच्या पापांची कबूली दिली आणि क्षमा मागितली. आणि यहोवाने त्याची प्रार्थना ऐकलीसुद्धा. (गण १४:१९, २०) पण असंही “एक पाप आहे, ज्याची शिक्षा मरण आहे.” ते म्हणजे सतत जाणूनबुजून पवित्र आत्म्याविरुद्ध केलेलं पाप. आणि अशा पापासाठी माफी नाही. अशा प्रकारे पाप करत राहणाऱ्‍यांसाठी एका ख्रिस्ती व्यक्‍तीने देवाकडे क्षमेची याचना करू नये.—१यो ५:१६; मत्त १२:३१; इब्री १०:२६, २७.

११-१७ नोव्हेंबर

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-२ पृ. २७९

प्रीतिभोजन

या प्रीतिभोजनांबद्दल किंवा मेजवान्यांबद्दल बायबलमध्ये सविस्तर माहिती दिलेली नाही. आणि या मेजवान्या किती वेळा ठेवण्यात यायच्या त्याबद्दलही बायबलमध्ये काही सांगितलेलं नाही. (यहू १२) येशू ख्रिस्ताने किंवा त्याच्या प्रेषितांनी या मेजवान्या ठेवण्याबद्दल कोणतीही आज्ञा दिली नव्हती. त्यामुळे या मेजवान्या ठेवणं गरजेचं नव्हतं हे स्पष्ट होतं. काही जण म्हणतात की असे काही प्रसंग असायचे जेव्हा श्रीमंत ख्रिस्ती आपल्या गरीब बांधवांना अशा मोठ्या मेजवान्यांसाठी आमंत्रण द्यायचे. अनाथ, विधवा, श्रीमंत आणि गरीब सगळे एकत्र मिळून या मेजवान्यांमध्ये बंधुप्रेमाचा आनंद लुटायचे.

इन्साइट-२ पृ. ८१६

खडक

स्पिलास या ग्रीक शब्दाचा संदर्भ पाण्याखाली लपलेल्या खडकाशी आहे. चुकीच्या हेतूने ख्रिस्ती मंडळीत शिरलेल्या माणसांसाठी यहूदाने या शब्दाचा वापर केला. पाण्याखाली लपलेले खडक ज्या प्रकारे जहाजांसाठी धोकेदायक होते, त्याच प्रकारे ही माणसं मंडळीत इतरांसाठी धोकेदायक होती. अशा माणसांबद्दल त्याने म्हटलं: “तुमच्या मेजवान्यांमध्ये तुमच्यासोबत खातपीत असलेली ही माणसे पाण्याखाली दडलेल्या खडकांसारखी आहेत.”—यहू १२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा