देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ पेत्र १-३
यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांसमोर ठेवा
यहोवा लवकरच आपल्या ठरवलेल्या वेळी या जगावर न्यायदंड बजावणार आहे. पण यहोवाच्या त्या दिवसासाठी आपण तयार आहोत, हे आपल्या कार्यांवरून दिसून येतं का?
‘आपली वागणूक पवित्र ठेवण्याचा आणि सुभक्तीची कार्यं करण्याचा’ काय अर्थ होतो?
आपण नैतिक रीत्या शुद्ध राहून आपला विश्वास दाखवून दिला पाहिजे
आपण एकांतात असू किंवा सर्वांसोबत, आपल्या उपासनेच्या संबंधित कार्यांमध्ये आपण नियमितपणे सहभाग घेतला पाहिजे