ख्रिस्ती जीवन
देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?
पवित्र पुस्तक असलेल्या बायबलमध्ये यहोवा देवाचे विचार आणि त्याचे शब्द आहेत. कारण तोच या पुस्तकाचा लेखक आहे. (२पेत्र १:२०, २१) यहोवा देवालाच संपूर्ण विश्वावर राज्य करण्याचा अधिकार आहे आणि तो हे त्याच्या राज्याद्वारे सिद्ध करेल, या गोष्टीवर बायबलमध्ये जोर देण्यात आला आहे. त्यामुळे मानवजातीला लवकरच येणाऱ्या एका चांगल्या जीवनाची आशा मिळते. यासोबतच स्वर्गीय पित्याच्या, यहोवाच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाबद्दलही बायबल आपल्याला सांगतं.—स्तो ८६:१५.
देवाच्या वचनाला मौल्यवान समजण्याची आपल्या प्रत्येकाकडे वेगवेगळी कारणं आहेत. पण दररोज त्याचं वाचन करून आणि त्यातल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करून या मौल्यवान देणगीबद्दल आपल्याला कदर असल्याचं आपण दाखवतो का? तर मग, दररोज त्याचं वाचन करण्याद्वारे आपल्याही भावना स्तोत्रकर्त्यासारख्याच आहेत हे आपण दाखवून देऊ या. त्याने म्हटलं: “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”—स्तो ११९:९७.
बायबल त्यांच्यासाठी मौल्यवान होतं—निवडक भाग (विल्यम टिंडेल) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
विल्यम टिंडेल यांनी बायबलच्या काही भागांचं भाषांतर का केलं?
बायबलचं भाषांतर करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत इतकी विशेष का होती?
टिंडेल यांच्या बायबल प्रती इंग्लंडमध्ये कशा प्रकारे लपवून आणण्यात आल्या?
आपल्याला देवाच्या वचनाची खरंच कदर आहे हे आपल्यापैकी प्रत्येक जण कसं दाखवू शकतो?