३० सप्टेंबर–६ ऑक्टोबरख्रिस्ती जीवन
“अशाच गोष्टींचा नेहमी विचार करत जा”
म्हणजे कोणत्या गोष्टींचा? अशा गोष्टींचा ज्याबद्दल फिलिप्पैकर ४:८ मध्ये सांगितलं आहे. म्हणजे खऱ्या, गांभीर्याने विचार करण्यासारख्या, नीतिमान, शुद्ध, प्रिय मानण्यालायक, आदरणीय, सात्त्विक आणि प्रशंसनीय गोष्टींचा. पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण बायबलचे विषय सोडून इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करू नये. उलट याचा अर्थ असा होतो, की आपल्या मनात चाललेले विचार नेहमी यहोवाला आवडणारे असले पाहिजेत. म्हणजे यहोवाला विश्वासू राहण्याचा आपला निर्धार कमकुवत होईल असा कोणताही विचार आपण आपल्या मनात येऊ दिला नाही पाहिजे.—स्तो १९:१४.
चुकीचे विचार टाळणं इतकं सोपं नाही. कारण आपल्याला फक्त आपल्या अपरिपूर्णतेशीच नाही तर ‘या जगाच्या व्यवस्थेच्या देवाविरुद्ध’ म्हणजे सैतानाविरुद्धही झगडावं लागतं. (२कर ४:४) आज संपूर्ण जगातली प्रसार माध्यमं त्याच्या हातात आहेत, जसं की टिव्ही, रेडिओ, इंटरनेट आणि छापील साहित्यं. यांमध्ये दिलेली बरीचशी माहिती एकदम खालच्या पातळीला घसरलेली आहे. कोणत्या गोष्टींवर विचार करायचा याबाबतीत आपण योग्य निवड केली नाही तर त्यामुळे आपले विचार दूषित होतील. आणि मग त्याचा वाईट परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यावरही होईल. —याक १:१४, १५.
यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—अयोग्य मनोरंजन, हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
बांधव आपल्या फोनमध्ये काय पाहत होता आणि याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला?
गलतीकर ६:७, ८ आणि स्तोत्र ११९:३७ या वचनांमुळे या बांधवाला कशी मदत मिळाली?