देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | याकोब १-२
पाप आणि मृत्यूकडे नेणारा मार्ग
चुकीचे विचार तुमच्या मनात डोकावतात तेव्हा खाली दिलेल्या गोष्टी करा:
दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष वळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.—फिलि ४:८
मोहाला बळी पडल्यामुळे होणाऱ्या वाईट परिणामांचा विचार करा.—अनु ३२:२९
प्रार्थना करा.—मत्त २६:४१
चुकीचे विचार मनात येतात, तेव्हा त्याऐवजी कोणत्या चांगल्या गोष्टींवर तुम्ही विचार करू शकता?