ख्रिस्ती जीवन
आपल्या विचारांमध्येसुद्धा यहोवाला एकनिष्ठ राहा
आपण आपल्या बोलण्यातूनच नाही, तर आपल्या विचारांमधूनही यहोवाला एकनिष्ठ असल्याचं दाखवलं पाहिजे. (स्तो १९:१४) म्हणून, बायबल आपल्याला असं उत्तेजन देतं, की आपण जे काही खरं, जे काही गंभीरतेने विचार करण्यासारखं, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही चांगलं आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार केला पाहिजे. (फिलि ४:८) हे खरं आहे, की आपण वाईट विचारांना नेहमीच थांबवू शकत नाही. पण आत्मसंयम बाळगल्यामुळे वाईट विचार मनातून काढून टाकायला आणि त्याऐवजी चांगल्या गोष्टींवर विचार करायला आपल्याला मदत होईल. आणि आपण जर आपल्या विचारांच्या बाबतीत यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर आपल्याला आपल्या कामांमध्येसुद्धा त्याला एकनिष्ठ राहता येईल.—मार्क ७:२१-२३.
आपण कोणत्या प्रकारचे विचार टाळले पाहिजेत ते पुढे दिलेल्या प्रत्येक वचनाखाली लिहा: