१६-२२ सप्टेंबरख्रिस्ती जीवन
दुष्काळाच्या वर्षात तुम्ही काय कराल?
विश्वास आणि भरवसा यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ, यहोवावर असलेल्या आपल्या मजबूत विश्वासामुळे आपण हा भरवसा बाळगू शकतो की तो आपलं संरक्षण करेल आणि आपली काळजी घेईल. (स्तो २३:१, ४; ७८:२२) जसजसा या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत आहे तसतसं आपल्यावर होणारं सैतानाचं आक्रमण आणखी वाढत जाईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. (प्रक १२:१२) मग अशा वेळी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
दुष्काळाच्या वर्षात तुम्ही काय कराल? हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
कोणत्या बाबतीत आपण यिर्मया १७:८ मध्ये सांगितलेल्या “झाडासारखे” आहोत?
व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टीला ‘उन्हाची झळ’ म्हटलं आहे?
झाडावर याचा काहीच परिणाम का होत नाही आणि का?
सैतानाला काय नष्ट करायचं आहे?
कोणत्या बाबतीत आपण अनुभवी विमान-प्रवाश्यांसारखे आहोत?
विश्वासू आणि बुद्धिमान दासावर आपण नेहमी भरवसा का ठेवला पाहिजे आणि आपल्या विश्वासाची परीक्षा कशी होऊ शकते?
जगातल्या लोकांनी आपली थट्टा केली तरी आपण नेहमी बायबलच्या तत्त्वांवर भरवसा का ठेवला पाहिजे?