वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. ५
  • तरुणांनो—‘चांगल्या कामांसाठी आवेशी असा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांनो—‘चांगल्या कामांसाठी आवेशी असा’
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियरांना आधार देणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पायनियरिंग करून यहोवाची स्तुती करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • पायनियरांसाठी आवश्‍यक असणाऱ्‍या तासांत बदल
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. ५

ख्रिस्ती जीवन

तरुणांनो—‘चांगल्या कामांसाठी आवेशी असा’

पौलने तीतला लिहिलेल्या आपल्या प्रेरित पत्रात, त्याने आणि त्याच्यासारख्या तरुणांनी ‘सर्व बाबतीत चांगली कार्यं करण्यासाठी’ एक आदर्श असलं पाहिजे, असं म्हटलं. (तीत २:६, ७) तसंच, पुढे याच अध्यायात, त्याने हेही दाखवून दिलं की यहोवाच्या लोकांनी ‘चांगल्या कामासाठी आवेशी’ असावं म्हणून त्यांना शुद्ध करण्यात आलं आहे. (तीत २:१४) या चांगल्या कामात, देवाच्या राज्याचा प्रचार करण्याचं आणि त्याबद्दल इतरांना शिकवण्याचं कामसुद्धा सामील आहे. तुम्ही पण एक तरुण असाल, तर या वयात असणारा तुमचा आवेश आणि उत्साह तुम्ही साहाय्यक पायनियर म्हणून किंवा रेग्युलर पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी वापरू शकता का?—नीत २०:२९.

जर पायनियर म्हणून सेवा करण्याची तुमची मनापासून इच्छा असेल, तर त्यासाठी कोण-कोणती व्यावहारिक पावलं उचलता येतील याविषयी योजना करा. (लूक १४:२८-३०) उदाहरणार्थ, पूर्ण वेळच्या सेवेत कार्य करत असताना तुम्ही तुमचा खर्च कसा भागवाल, पायनियर सेवेचे तास कसे भरून काढाल यासारख्या गोष्टींचा आधीच विचार करा. आणि तुमच्या परिस्थितीबद्दल प्रार्थनेत यहोवासोबत बोला. (स्तो ३७:५) तुमच्या पालकांसोबत आणि पायनियर म्हणून जे यशस्वीपणे सेवा करत आहेत, अशांसोबत तुमच्या योजनांविषयी बोला. आणि मग तुमच्या ध्येयानुसार पावलं उचला. यहोवाच्या सेवेत तुम्ही आवेशाने जे काही परिश्रम घेत आहात, त्यावर तो नक्कीच आशीर्वाद देईल!

यहोवाच्या नावाला गौरव देणारे तरुण हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • पायनियर म्हणून सेवा करताना काही जणांनी कोण-कोणत्या समस्यांवर मात केली आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागलं?

  • पालक, त्यांच्या मुलांना पायनियर बनण्यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतात?

  • प्रचारकार्यासाठी एक आराखडा असणं का महत्त्वाचं आहे?

  • मंडळीतले सदस्य पायनियर बंधुभगिनींना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतात आणि मदत करू शकतात?

  • पायनियर म्हणून सेवा करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?

एक तरुण बहीण आपल्या वडिलांसोबत पायनियरींगबद्दल बोलताना; एक तरुण पायनियर बांधव स्वतःसाठी आराखडा बनवत असताना, एक तरुण पायनियर बहीण दुसऱ्‍या बहिणीसोबत प्रचार करत असताना, एक पायनियर बहीण बायबल अभ्यास घेत असताना

मला पायनियर बनण्याचं ध्येय कसं गाठता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा