वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwbr19 मे पृ. १-३
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
  • जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
  • उपशिर्षक
  • ६-१२ मे
  • १३-१९ मे
  • २०-२६ मे
  • २७ मे–२ जून
जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ—२०१९
mwbr19 मे पृ. १-३

जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ

६-१२ मे

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|२ करिंथकर ४-६

“आम्ही धैर्य सोडत नाही”

इन्साइट-१ पृ. ७२४-७२५

सहनशक्‍ती

परिपूर्ण अवस्थेत सदासर्वकाळ जीवन जगण्याची आशा आपल्याजवळ आहे. पण या ख्रिस्ती आशेला आपल्या डोळ्यांसमोर नेहमी जिवंत ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपली ही आशा, छळ करणाऱ्‍यांच्या हातून आलेला मृत्यूदेखील हिरावून घेऊ शकत नाही. (रोम ५:४, ५; १थेस १:३; प्रक २:१०) ही जबरदस्त आशा, वास्तविकतेत खरी ठरल्यानंतर जे साध्य होईल त्याचा विचार केला, तर त्यासमोर आज सहन कराव्या लागणाऱ्‍या गोष्टी एकदम क्षुल्लक वाटू लागतील. जणू या आशेसमोर त्यांचं अस्तित्वच नाही. (रोम ८:१८-२५) कारण दुःख जरी काही वेळा सहन करण्यापलीकडे वाटत असलं, तरी अनंतकाळच्या तुलनेत ते ‘तात्पुरतं आणि हलकंच’ आहे. (२कर ४:१६-१८) त्यामुळे, जी व्यक्‍ती तिच्यावर येणारी संकटं फक्‍त तात्पुरत्या काळासाठी आहेत हे लक्षात घेते आणि आपल्या ख्रिस्ती विश्‍वासाला जडून राहते, ती निराश किंवा हताश होण्यापासून आणि यहोवाला अविश्‍वासू राहण्यापासून स्वतःला दूर ठेवत असते.

आध्यात्मिक रत्नं शोधा

टेहळणी बुरूज१२-E २/१ पृ. २८-२९

“यहोवाच्या चेहऱ्‍यावर हास्य झळकू द्या”

नियमन मंडळाचे सदस्य बंधू डेविड स्प्लेन यांनी या वचनावर प्रकाश टाकला. (२ करिंथकर ४:७) या वचनात सांगितलेली संपत्ती काय आहे, बुद्धी की ज्ञान? बंधू स्प्लेन यांनी याचं उत्तर “नाही” असं दिलं. कारण “प्रेषित पौलने ज्या संपत्तीचा उल्लेख केला ती एक अशी ‘सेवा’ आहे, ज्याद्वारे ‘सत्य जाहीर’ केलं जातं.” (२ करिंथकर ४:१, २, ५) बंधू स्प्लेन यांनी विद्यार्थ्यांना याची आठवण करून दिली, की या विद्यार्थ्यांना अभ्यासात घालवावे लागलेले पाच महिने एका खास नेमणुकीच्या तयारीसाठी होते. आणि ही नेमणूक त्यांच्यासाठी एका मोठ्या बहुमानासारखी आहे.

बंधू स्प्लेन पुढे म्हणाले की ‘मातीचं भांडं’ आपल्या हाडामांसाच्या शरीराला सूचित करतं. त्यांनी मातीच्या भांड्याची तुलना सोन्याच्या भांड्याशी केली. सोन्याची भांडी जास्त वापरली जात नाहीत. पण मातीच्या भांड्यांचा सर्वात जास्त उपयोग होतो. आपण जर सोन्याच्या भांड्यात आपली संपत्ती ठेवली, तर आपलं लक्ष जितकं त्या संपत्तीवर आहे तितकंच त्या सोन्याच्या भांड्यावरही असेल. हे सांगितल्यावर बंधू स्प्लेन म्हणाले: “एक मिशनरी या नात्याने तुम्ही मातीच्या भांड्याप्रमाणे नम्र असलं पाहिजे. म्हणून तुम्ही कधीही लोकांचं लक्ष स्वतःकडे नाही, तर यहोवाकडे वेधण्याचा प्रयत्न करा.”

१३-१९ मे

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|२ करिंथकर ७-१०

“आपलं मदतकार्य”

राज किताब अध्या. २० परि. १

राहत सेवा

करीब ईसवी सन्‌ ४६ की बात है। पूरा यहूदिया प्रदेश अकाल की चपेट में आ गया था। जो थोड़ा-बहुत अनाज मिलता था उसका दाम आसमान छूने लगा था। वहाँ के यहूदी मसीहियों के पास इतने पैसे नहीं थे कि वे अनाज खरीद सकें। भूख से उनकी हालत खराब हो रही थी। मगर जल्द ही वे महसूस करनेवाले थे कि यहोवा कैसे उन्हें बचाएगा। यह एक ऐसा अनोखा अनुभव होता जो इससे पहले कभी मसीह के चेलों के साथ नहीं हुआ था। आखिर ऐसा क्या होनेवाला था?

राज किताब अध्या. २० परि. ४-६

राहत सेवा

कुरिंथियों को लिखी दूसरी चिट्ठी में पौलुस ने समझाया कि हम मसीहियों की सेवा के दो पहलू हैं। हालाँकि पौलुस ने यह चिट्ठी अभिषिक्‍त मसीहियों को लिखी थी, मगर उसकी सलाह आज मसीह की ‘दूसरी भेड़ों’ पर भी लागू होती है। (यूह. १०:१६) हमारी सेवा का एक पहलू है, प्रचार और सिखाने का काम जो कि “सुलह करवाने की सेवा” है। (२ कुरिं. ५:१८-२०; १ तीमु. २:३-६) दूसरा पहलू है, अपने भाई-बहनों की मदद करना। पौलुस ने खासकर मुसीबत के वक्‍त उन्हें “राहत पहुँचाने” की बात की। (२ कुरिं. ८:४) सेवा के इन दोनों पहलुओं के लिए यूनानी में एक ही शब्द दीआकोनीया इस्तेमाल किया गया है। यह बात क्यों गौर करने लायक है?

पौलुस ने दोनों तरह की सेवा के लिए एक ही यूनानी शब्द का इस्तेमाल करके दिखाया कि राहत काम भी उतना ही अहम है जितना कि मसीही मंडली में किए जानेवाले दूसरे काम हैं। उसने अपनी पहली चिट्ठी में कहा था, “सेवाएँ अलग-अलग तरह की हैं, फिर भी प्रभु एक ही है। और जो काम हो रहे हैं वे अलग-अलग तरह के हैं, . . . मगर ये सारे काम वही एक पवित्र शक्‍ति करती है।” (१ कुरिं. १२:४-६, ११) पौलुस ने मंडली में होनेवाले सब तरह के कामों को “पवित्र सेवा” कहा। (रोमि. १२:१, ६-८) इसीलिए उसने अपना कुछ समय “पवित्र जनों की सेवा करने” में लगाना ज़रूरी समझा!​—रोमि. १५:२५, २६.

पौलुस ने कुरिंथियों को समझाया कि राहत काम क्यों उनकी सेवा और यहोवा की उपासना का एक हिस्सा है। ध्यान दीजिए कि उसने क्या दलील दी: मसीही इसलिए दूसरों को राहत पहुँचाते हैं क्योंकि वे ‘मसीह के बारे में खुशखबरी के अधीन रहते हैं।’ (२ कुरिं. ९:१३) हम यीशु की शिक्षाओं पर चलना चाहते हैं, इसीलिए हम भाई-बहनों की मदद करते हैं। पौलुस ने कहा कि जब हम इस तरह मदद करते हैं तो दरअसल यह “परमेश्‍वर की अपार महा-कृपा” का एक सबूत है। (२ कुरिं. ९:१४; १ पत. ४:१०) इसलिए १ दिसंबर, १९७५ की प्रहरीदुर्ग ने ज़रूरतमंद भाइयों की मदद करने के बारे में, जिसमें राहत काम भी शामिल है, बिलकुल सही बात कही: “हमें इस बात पर कभी संदेह नहीं करना चाहिए कि यहोवा परमेश्‍वर और उसका पुत्र यीशु मसीह इस तरह की सेवा को बहुत महत्त्व देते हैं।” जी हाँ, राहत का काम पवित्र सेवा का एक ज़रूरी हिस्सा है।​—रोमि. १२:१, ७; २ कुरिं. ८:७; इब्रा. १३:१६.

राज किताब अध्या. १८ परि. १०

राज के कामों का खर्चा कैसे पूरा होता है

पहली वजह, हम अपनी इच्छा से दान इसलिए देते हैं क्योंकि हम यहोवा से प्यार करते हैं और वही करना चाहते हैं “जो उसकी नज़र में अच्छा है।” (१ यूह. ३:२२) यहोवा वाकई ऐसे इंसान से खुश होता है जो दिल से दान देता है। गौर कीजिए कि प्रेषित पौलुस ने बताया कि मसीहियों को किस भावना से दान देना चाहिए। (२ कुरिंथियों ९:७ पढ़िए।) एक सच्चा मसीही न तो दान देने से झिझकता है और न ही उसे मजबूर करना पड़ता है। वह दान इसलिए देता है क्योंकि वह ‘दिल में ऐसा करने की ठान लेता है।’ दूसरे शब्दों में कहें तो जब वह देखता है कि दान की ज़रूरत है तो सोचता है कि वह कैसे मदद कर सकता है, फिर वह दान देता है। ऐसा इंसान यहोवा को भाता है क्योंकि बाइबल कहती है कि “परमेश्‍वर खुशी-खुशी देनेवाले से प्यार करता है।”

२०-२६ मे

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. १२५९-१२६०

ईर्ष्यावान, ईर्ष्या

देव जसं आपल्या सेवकांसाठी ईर्ष्या बाळगतो तसं आपल्या बांधवांसाठी ख्रिश्‍चनांनी ईर्ष्या बाळगणं एक चांगली गोष्ट आहे. अशी ईर्ष्या बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीला एकमेकांना मदत करण्यासाठी होता होईल तितकं करण्याची तीव्र इच्छा असते. आणि त्यामुळे देवाला एकनिष्ठ राहणं आणि ख्रिस्ताला आज्ञाधारक राहणं शक्य होतं. प्रेषित पौलने आपल्या आध्यात्मिक बांधवांची तुलना अशा एका कुमारीशी केली, जिला ख्रिस्ताची पत्नी होण्याकरता निवडण्यात आलं होतं. यामुळे ख्रिस्तापुढे त्यांना निर्दोष असं सादर करता यावं म्हणून त्यांचं संरक्षण करण्यासाठी तो ईर्ष्या बाळगून होता. (२कर ११:२; प्रक १९:७, ८ पडताळून पाहा.) त्याचा हा आवेश करिंथ मंडळीला आणि इतरांना ज्या प्रकारे त्याने पत्र लिहिलं आहे, त्यातून दिसून येतो.

२७ मे–२ जून

आध्यात्मिक रत्नं शोधा

इन्साइट-१ पृ. ८८०

गलतीकरांना पत्र

‘मूर्ख गलतीकरांनो!’ असं जेव्हा पौलने म्हटलं, तेव्हा तो गलतीयाच्या उत्तर भागात असणाऱ्‍या एका ठरावीक वंशाच्या लोकांना उद्देशून बोलत होता, असं नक्कीच म्हणता येणार नाही. (गल ३:१) उलट, तिथल्या मंडळीत असणाऱ्‍या काही लोकांना खडसावून, त्यानं असं म्हटलं होतं. कारण या लोकांवर त्यांच्यात असणाऱ्‍या काही यहुदी मत समर्थकांचा प्रभाव होत असल्याचं त्याला दिसून आलं. हे यहुदी मत समर्थक येशूच्या नवीन करारावर असणाऱ्‍या विश्‍वासाद्वारे नव्हे, तर मोशेच्या नियमशास्त्रातल्या गोष्टींच्याद्वारे स्वतःला नीतिमान ठरवत होते. (२:१५-३:१४; ४:९, १०) वांशिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर गलतीयामधल्या ज्या मंडळ्यांना पौलने लिहिलं होतं (१:२), त्या मंडळ्या यहुदी आणि यहुदी नसणाऱ्‍या विदेशी लोकांनी मिळून बनल्या होत्या. यांमध्ये काहींनी यहुदी धर्म स्वीकारला होता. तर काही जण सुंता न झालेल्या विदेशी लोकांपैकी होते. यासोबतच त्यांच्यामध्ये सेल्टिक वंशाचेही काही लोक होते. (प्रेका १३:१४, ४३; १६:१; गल ५:२) हे सर्व जण ज्या प्रदेशात राहत होते त्याचं नाव गलतीया असल्यामुळे पौलने त्यांना गलतीकरांनो असं म्हटलं. थोडक्यात, पत्राचा आशय लक्षात घेतला तर हे स्पष्ट होतं की तो उत्तर भागातील अनोळखी लोकांना लिहीत नव्हता तर रोमी सत्तेखाली असणाऱ्‍या दक्षिण भागातील अशा लोकांना लिहीत होता ज्यांच्याशी त्याची चांगली ओळख होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा