जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
३-९ जून
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|गलतीकर ४-६
“आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं एक ‘लाक्षणिक’ नाटक!”
इन्साइट-१ पृ. १०१८ परि. २
हागार
प्रेषित पौलने स्पष्ट केल्याप्रमाणे, हागार लाक्षणिक अर्थाने इस्राएल राष्ट्राला सूचित करत होती. सीनाय पर्वताजवळ यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबत नियमशास्त्राचा करार केला होता. आणि या करारामुळे हे राष्ट्र यहोवाशी बांधलेलं होतं. त्यामुळे इस्राएल राष्ट्राने या कराराद्वारे जणू आपल्या मुलांना “दास्यत्वासाठी” जन्माला घातलं. पण या राष्ट्रातील लोकांच्या पापी अवस्थेमुळे, त्यांना कराराच्या अटी पाळणं शक्य झालं नाही. आणि त्यामुळे या लोकांना कराराच्या दास्यत्वातून कधीच मुक्त होता आलं नाही. उलट, पापी लोक म्हणून त्यांना मृत्यूदंडासाठी पात्र ठरवण्यात आलं. आणि अशा प्रकारे ते दास्यात राहिले. (योह ८:३४; रोम ८:१-३) या इस्राएल राष्ट्रासोबतच हागार, पौलच्या काळातल्या यरुशलेम शहरालासुद्धा सूचित करत होती. कारण हे शहर इस्राएल राष्ट्राची राजधानी असल्यामुळे त्या राष्ट्राच्या शासन व्यवस्थेला सूचित करत होतं. त्यामुळे इस्राएल राष्ट्राच्या मुलांसोबत यरुशलेमसुद्धा एका अर्थाने दास्यात होतं. पण आत्म्याने अभिषेक केलेले ख्रिस्ती मात्र “वरील यरुशलेम” म्हटलेल्या देवाच्या लाक्षणिक पत्नीची मुलं होती. स्वतंत्र स्त्री असणाऱ्या सारासारखं हे ‘वरील यरुशलेम,’ कधीच कोणाच्या दास्यात नव्हतं. पण इश्माएलने ज्या प्रकारे इसहाकचा छळ केला, त्या प्रकारे दास्यात असणाऱ्या यरुशलेमच्या मुलांनीही देवाच्या पुत्राद्वारे मुक्त करण्यात आलेल्या “वरील यरुशलेमच्या” मुलांचा छळ केला. पण शेवटी हागार आणि तिच्या मुलाला हाकलून देण्यात आलं. ही गोष्ट यहोवाने वास्तविक इस्राएल राष्ट्राचा त्याग केला, त्या गोष्टीला सूचित करते.—गल ४:२१-३१; योह ८:३१-४० सुद्धा पाहा.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज१०-E ११/१ पृ. १५
तुम्हाला माहीत होतं का?
प्रेषित पौल त्याच्या शरीरावर “येशूचा दास अशी ओळख करून देणाऱ्या खुणा आहेत” असं कोणत्या अर्थाने म्हणत होता?—गलतीकर ६:१७.
▪ पौलने ज्या शब्दांचा वापर केला आहे, त्यामुळे पहिल्या शतकात त्याचे शब्द ऐकणाऱ्या लोकांच्या मनात कदाचित बऱ्याच गोष्टी आल्या असतील. उदाहरणार्थ, प्राचीन काळात युद्धात पराभव झालेल्या कैद्यांना, मंदिराची लूट करणाऱ्या गुन्हेगारांना आणि पळून आलेल्या दासांना त्यांची ओळख म्हणून त्यांच्यावर, तापून लाल केलेल्या लोखंडाने खुणा केल्या जायच्या. कोणत्याही व्यक्तीवर खासकरून अशा प्रकारे केलेल्या खुणा एक अपमानास्पद गोष्ट समजली जायची.
पण, शरीरावर केल्या जाणाऱ्या खुणा नेहमीच नकारात्मक अर्थानं घेतल्या जात नव्हत्या. प्राचीन काळात लोक आपण विशिष्ट वंशाचे किंवा धर्माचे आहोत हे दाखवण्यासाठीसुद्धा अशा चिन्हांचा किंवा खुणांचा वापर करायचे. याचं एक उदाहरण म्हणजे, थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट नावाच्या एका शब्दकोशानुसार, “प्राचीन सिरियामधले लोक हदाद आणि अतर्गतीस नावाच्या देवांना स्वतःला समर्पित करण्यासाठी आपल्या मनगटावर किंवा मानेवर चिन्ह करून घ्यायचे. . . . तसंच, डायनायसस देवाला समर्पित असलेल्या लोकांवर एका विशिष्ट वेलीच्या पानाचं चिन्ह केलं जायचं.”
अलीकडच्या काळातल्या बऱ्याच टिकाकारांचं असं मत आहे की, मिशनरी दौऱ्यात असताना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या छळामुळे पौल त्याच्या शरीरावर झालेल्या खुणांबद्दल इथे बोलत होता. (२ करिंथकर ११:२३-२७) पण कदाचित असंही असू शकतं की पौल आपल्या शरीरावर असलेल्या खुणांबद्दल नाही तर आपली सेवा पूर्ण करण्यासाठी एक ख्रिस्ती म्हणून त्यानं ज्या प्रकारचं जीवन निवडलं होतं, त्याबद्दल बोलत असावा.
१०-१६ जून
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|इफिसकर १-३
“यहोवाने केलेली व्यवस्था आणि तिचं कार्य”
इन्साइट-२ पृ. ८३७ परि. ४
पवित्र रहस्य
मसीही राज्य. प्रेषित पौलने आपल्या लिखाणात ख्रिस्ताकडून प्रकट करण्यात आलेल्या पवित्र रहस्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. इफिसकर १:९-११ मध्ये देव त्याच्या इच्छेबद्दल असलेलं “पवित्र रहस्य” कळवत असल्याचं पौल सांगतो. आणि त्याबद्दल बोलताना तो म्हणतो: “[देवाला] चांगले वाटले त्याप्रमाणे त्याने स्वतः असा संकल्प केला, की सर्व गोष्टी, अर्थात स्वर्गातल्या गोष्टी व पृथ्वीवर असलेल्या गोष्टी, ख्रिस्तामध्ये एकत्रित करण्यासाठी नियुक्त काळांच्या समाप्तीला एक व्यवस्था करावी. हो, त्याच ख्रिस्तामध्ये ज्याच्यासोबत आम्ही ऐक्यात आहोत आणि ज्याच्यासोबत वारसदार होण्याकरता आम्हाला नेमण्यात आले होते. देव, जो सर्व गोष्टी आपल्या इच्छेनुसार ठरवून पूर्ण करतो, त्याने आपल्या संकल्पानुसार आम्हाला याकरता पूर्वीच नेमले होते.” देवाच्या या ‘पवित्र रहस्यात’ एक सरकार म्हणजे देवाचं मसीही राज्य समाविष्ट आहे. या मसीही राज्यामध्ये खिस्तासोबत वारसदार असणाऱ्यांना पौलने “स्वर्गातल्या गोष्टी” असं म्हटलं आहे. तसंच, या मसीही राज्याच्या शासनाखाली असणाऱ्या पृथ्वीवरील लोकांना त्याने “पृथ्वीवर असलेल्या गोष्टी” असं म्हटलं आहे. येशूनेही या पवित्र रहस्याचा देवाच्या राज्याशी संबंध असल्याचं दाखवत आपल्या शिष्यांना असं म्हटलं: “देवाच्या राज्याचं पवित्र रहस्य समजून घेण्याचं वरदान तुम्हाला देण्यात आलं आहे.” —मार्क ४:११.
आध्यात्मिक रत्नं शोधा
यहोवा के करीब अध्या. २९ परि. २१
‘मसीह के प्रेम को जानो’
जिस यूनानी शब्द का अनुवाद “को जान” किया गया है, उसका मतलब है “व्यावहारिक तरीके से, अनुभव के ज़रिए” जानना। जब हम यीशु की तरह प्रेम करेंगे—दूसरों की भलाई करने में निःस्वार्थ भाव से खुद को लगा देंगे, करुणा दिखाकर उनकी ज़रूरतों के मुताबिक काम करेंगे, दिल से उन्हें माफ करेंगे—तब हम सही मायनों में उसकी भावनाओं को समझ सकेंगे। इस तरह, हम अनुभव से ‘मसीह के उस प्रेम को जान पाते हैं जो ज्ञान से परे है।’ और हाँ, हम यह कभी न भूलें कि हम जितना ज़्यादा मसीह के जैसे होते हैं, उतना ज़्यादा हम अपने प्रेमी परमेश्वर यहोवा के करीब आते हैं, क्योंकि मसीह हू-ब-हू अपने इस पिता के जैसा था।
१७-२३ जून
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ११२८ परि. ३
पवित्रता
पवित्र आत्मा. यहोवाची कार्यकारी शक्ती किंवा त्याचा आत्मा पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात असून नेहमी त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्य करतो. ही एक अशी शक्ती आहे, जी नेहमी शुद्ध आणि पवित्र असून देवाच्या चांगल्या कार्यासाठी खर्च होते. म्हणूनच तिला “पवित्र आत्मा” किंवा ‘पवित्रतेचा आत्मा’ असं म्हटलं आहे. (स्तो ५१:११; लूक ११:१३; रोम १:४; इफि १:१३) जेव्हा एका व्यक्तीवर पवित्र आत्मा कार्य करत आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण अशा शक्तीबद्दल बोलत असतो जी मुळात पवित्र आणि शुद्ध आहे. त्यामुळे कोणतीही अशुद्ध किंवा चुकीची सवय पवित्र आत्म्याला रोखण्याचं किंवा “दु:खी” करण्याचं कारण बनू शकते. (इफि ४:३०) देवाचा पवित्र आत्मा म्हणजे त्याची पवित्र शक्ती त्याच्या उद्देशानुसार आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार कार्य करते. त्यामुळे पवित्र आत्म्याला, म्हणजे त्याच्या पवित्र शक्तीला रोखणं हे देवाच्या उद्देशाच्या विरुद्ध कार्य केल्यासारखं होईल. त्यामुळे पवित्र आत्मा एक व्यक्ती नसली तरी ही गोष्ट पवित्र आत्म्याला दुखवणारी म्हणजे दुसऱ्या शब्दात स्वतः देवाला दुखवणारी आहे. म्हणूनच कोणतीही वाईट गोष्ट सतत करत राहण्याद्वारे “पवित्र आत्म्याची आग विझवू नका,” असं म्हटलं आहे. (१थेस ५:१९) जर एक व्यक्ती अशा प्रकारचं कार्य करत राहिली, तर ती देवाच्या आत्म्याला “दु:खी” करेल आणि अशा बंडखोर प्रवृत्तीमुळे देवाची शत्रू बनेल. (यश ६३:१०) एक व्यक्ती देवाच्या पवित्र आत्म्याला इतक्या थरापर्यंत दुःखी करू शकते की ते जणू पवित्र आत्म्याची निंदा केल्यासारखं होऊ शकतं. अशा प्रकारच्या पापाची येशूने सांगितल्याप्रमाणे ना आता, ना पुढेही क्षमा केली जाऊ शकते.—मत्त १२:३१, ३२; मार्क ३:२८-३०.
इन्साइट-१ पृ. १००६ परि. २
लोभ
कृतीतून दिसून येतो. एखाद्याच्या निर्लज्जपणाच्या वर्तनातून मोह किंवा लोभ दिसून येतो. त्यामुळे एका व्यक्तीच्या मनात दडलेल्या चुकीच्या अनियंत्रित इच्छा उघड होतात. बायबलचा लेखक, याकोब आपल्याला सांगतो की चुकीची इच्छा, गर्भवती होऊन पापाला जन्म देते. (याक १:१४, १५) त्यामुळे लोभी व्यक्तीला तिच्या कार्यांद्वारे ओळखता येतं. प्रेषित पौलने सांगितलं की लोभी असणं हे मूर्तिपूजक असण्यासारखं आहे. (इफि ५:५) कारण लोभी व्यक्तीचा कल निर्माणकर्त्याच्या सेवेपेक्षा व उपासनेपेक्षा आपल्या स्वार्थी इच्छांना जास्त प्राधान्य देण्याकडे असतो. आणि अशा प्रकारे ती गोष्ट जणू त्या व्यक्तीसाठी देवासारखी बनते.—रोम १:२४, २५.