देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान २०-२१
“तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”
बायबल काळातले मासेमार धीर धरून मेहनत करायचे आणि खूप कष्ट घ्यायचे. यामुळे ते आपल्या कामात यशस्वी व्हायचे. (टेहळणी बुरूज१२-E ८/१ परि. १८-२०) या गुणांमुळे पेत्रला माणसं धरण्याच्या कामांत यशस्वी व्हायला मदत होणार होती. पण पेत्रला एक गोष्ट ठरवण्याची गरज होती. ती म्हणजे तो आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला पहिल्या स्थानी ठेवेल, त्याला आवडणाऱ्या मासेमारीच्या कामाला की येशूच्या अनुयायांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याच्या कामाला?
देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवण्यासाठी तुम्ही कोणते फेरबदल केले आहेत?