ख्रिस्ती जीवन
प्रेम खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे—मौल्यवान असलेल्या ऐक्याचं रक्षण करा
हे का महत्त्वाचं: येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने प्रार्थना केली की त्याचे शिष्य “पूर्णपणे एकतेत” असतील. (योह १७:२३, तळटीप) ऐक्यात राहण्यासाठी आपण असं प्रेम दाखवलं पाहिजे जे “चुकांचा हिशोब ठेवत नाही.”—१कर १३:५.
हे कसं करावं:
इतरांमध्ये चांगलं पाहण्याद्वारे यहोवाचं अनुकरण करा
मनापासून क्षमा करा
मतभेद सोडवल्यावर तो विषय परत काढू नका.—नीत १७:९
‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्या—अपकार स्मरू नका हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
व्हिडिओच्या पहिल्या भागात हेलेनने कसं दाखवलं की ती “चुकांचा हिशोब ठेवत” आहे?
दुसऱ्या भागात हेलेनने तिच्या नकारात्मक भावनांवर कशी मात केली आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित केला?
हेलेनने मंडळीच्या ऐक्याला कसा हातभर लावला?
जेव्हा आपण चुकांचा हिशोब ठेवतो तेव्हा सगळ्यात जास्त आपण कोणाला दुखावतो?