ईश्वरी शिक्षणामुळे ऐक्य—खऱ्या बंधुवर्गातील ऐक्याचे चित्र
मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यास अद्याप सुरवात न केलेल्या एका स्त्रीबरोबर घेतल्या जाणाऱ्या बायबल अभ्यासाला एक प्रवासी पर्यवेक्षक गेले होते. त्यांनी तिला ईश्वरी शिक्षणामुळे ऐक्य (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहण्यासाठी आमंत्रण दिले. त्या आठवडी ती सभेला उपस्थित राहिली व म्हणाली की सभेला उपस्थित राहिल्यामुळे तिला खूप आनंद वाटला. या व्हिडिओचा तिच्यावर इतका लवकर परिणाम का झाला बरे? हिंसा व द्वेष यांनी भरलेल्या या जगात आपल्या मौल्यवान बंधूसमाजाचे ऐक्य पाहून ती खूप प्रभावीत झाली होती.—योहान १३:३५.
संपूर्ण पृथ्वीवरील यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असलेली शांती व प्रेम तुम्हाला पाहायचे असेल व अनुभवायचे असेल तर हा व्हिडिओ पाहा. आणि मग खालील प्रश्नांवर मनन करा:
(१) “ईश्वरी शिक्षण” हे शीर्षक, १९९३-९४ च्या अधिवेशनांकरता उचित का होते?—मीखा ४:२.
(२) बायबल सत्याचा काही कुटुंबांवर काय परिणाम झाला? तुमच्यावर त्याचा काय परिणाम झाला आहे?
(३) यहोवाकडून शिक्षण प्राप्त करणे महत्त्वाचे का आहे?—स्तो. १४३:१०.
(४) मोठ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांची तयारी करताना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते?
(५) तुम्ही उपस्थित राहिलेल्या ख्रिस्ती अधिवेशनांमध्ये स्तोत्र १३३:१ व मत्तय ५:३ ही वचने कोणत्या बाबतीत खरी ठरल्याचे तुम्ही पाहिले आहे?
(६) ईश्वरी शिक्षणाच्या प्रभावाचे कोणते जबरदस्त पुरावे आपल्यासमोर आहेत?—प्रकटी. ७:९.
(७) खऱ्या ख्रिश्चनांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात बाप्तिस्मा घेण्याचा प्रसंग कोणता होता?
(८) यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत मीखा, पेत्र आणि येशू यांचे कोणते शब्द पूर्ण होत आहेत?
(९) आनंदी व ऐक्य असलेले मानवी कुटुंब हे निव्वळ स्वप्न नव्हे याची खात्री तुम्हाला कशावरून पटते?
(१०) तुम्ही हा व्हिडिओ कोणाला दाखवणार आहात व का?
हा व्हिडिओ पाहिल्यावर एका बहिणीने अतिशय सुरेख शब्दांत आपले मत व्यक्त केले: “संपूर्ण जगभरातील अनेक ख्रिस्ती बंधूभगिनी या क्षणाला यहोवाची एकनिष्ठेने सेवा करत आहेत ही गोष्ट सतत लक्षात ठेवायला हा व्हिडिओ मला मदत करेल. . . . बांधवांमधले आपले ऐक्य किती मौल्यवान आहे!”—इफिस. ४:३.