देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक ६-७
उदारतेने मापून द्या
एक उदार व्यक्ती इतरांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपला वेळ, शक्ती आणि साधनसंपत्ती आनंदाने खर्च करते.
“देत राहा” हा वाक्यांश ज्या ग्रीक क्रियापदावरून घेण्यात आला आहे, ते सतत घडणाऱ्या क्रियेला सूचित करतं
जेव्हा आपण इतरांना देत राहतो, तेव्हा तेही आपल्या पदरात “भरपूर माप, हलवून, दाबून व ओसंडून वाहेपर्यंत ओततील.” हा वाक्यांश अशा एका रूढीला सूचित करत असावा ज्यामध्ये काही दुकानदार ग्राहकाच्या पदरात म्हणजेच त्याच्या अंगरख्याच्या झोळीत भरभरून वस्तू द्यायचे