ख्रिस्ती जीवन
“देवाने जे जोडलं आहे . . . ”
मोशेच्या नियमशास्त्रानुसार एक पती जर आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायच्या विचारात असेल, तर त्याने कायदेशीर कागदपत्र तयार करावं अशी अपेक्षा त्याच्याकडून केली जायची. घाईघाईने आणि अविचारीपणे घटस्फोट घेणं टाळता यावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. पण येशूच्या दिवसांत धार्मिक पुढाऱ्यांनी घटस्फोट मिळवणं खूप सोपं केलं होतं. त्यामुळे पुरुष कोणत्याही कारणासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत होते. (“सोडचिठ्ठी” अभ्यासासाठी माहिती-मार्क १०:४, nwtsty; “आपल्या पत्नीला घटस्फोट देतो” “तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो” अभ्यासासाठी माहिती-मार्क १०:११, nwtsty) येशूने सांगितलं की विवाहबंधनाची स्थापना आणि सुरुवात यहोवा देवाने केली आहे. (मार्क १०:२-१२) एक पती आणि पत्नी लग्नानंतर “एकदेह” होतात व त्यांचं हे बंधन कायमस्वरूपाचं असतं. मत्तयच्या समान अहवालावरून स्पष्ट होतं की “अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय” इतर कोणत्याही कारणामुळे घटस्फोट देण्याला शास्त्रीय आधार नाही.—मत्त १९:९.
आज बऱ्याच लोकांचा लग्नाबद्दल दृष्टिकोन हा येशूसारखा नसून परूशी लोकांसारखा आहे. जेव्हा विवाहात समस्या उद्भवतात तेव्हा जगातले लोक घटस्फोट घेण्यासाठी घाई करतात. पण ख्रिस्ती जोडपी तसं करत नाहीत. लग्नाची शपथ त्यांच्यासाठी खूप गंभीर असते. तसंच, आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी ते बायबलमध्ये दिलेली तत्त्वं लागू करायला खूप मेहनत घेतात. प्रेम आणि आदर कुटुंबाला जोडतं हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
नीतिसूत्रे १५:१ मध्ये दिलेलं तत्त्व पती-पत्नी कसं लागू करू शकतात आणि असं करणं महत्त्वाचं का आहे?
नीतिसूत्रे १९:११ मध्ये दिलेलं तत्त्व लागू केल्याने तुम्ही समस्या कशा टाळू शकता?
जर तुमचा विवाह मोडण्याच्या बेतात असेल, तर ‘मी घटस्फोट घ्यावा का?’ असा विचार करण्याऐवजी तुम्ही कोणते प्रश्न विचारात घेतले पाहिजेत?
मत्तय ७:१२ मध्ये दिलेलं तत्त्व लागू केल्याने तुम्ही एक चांगला पती किंवा चांगली पत्नी कशी बनू शकता?