आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 डिसेंबर पृ. ५
ख्रिस्ती जीवन
आठवड्यादरम्यान होणाऱ्या सभेचं नवीन वैशिष्ट्य
जानेवारी २०१८ पासून आठवड्यादरम्यानच्या सभेत, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स याच्या ऑनलाईन अभ्यास आवृत्तीमध्ये (nwtsty) असलेल्या अभ्यासासाठी माहिती आणि मिडिया यांचा समावेश असेल. ही आवृत्ती तुमच्या भाषेत सध्या जरी उपलब्ध नसली, तरीही सभेत यांचा समावेश केला जाईल. त्यामुळे तुमची सभेची तयारी अधिक अर्थपूर्ण बनेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा प्रेमळ पिता यहोवा याच्यासोबत तुमचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल.