देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ४६-४८
पुनर्स्थापित झालेल्या इस्राएल राष्ट्राला मिळणारे आशीर्वाद
यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्तामुळे बंदिवासातल्या इस्राएली लोकांना प्रोत्साहन मिळालं. तसंच, पुनर्स्थापना होईल अशा ज्या भविष्यवाण्या आधी करण्यात आल्या होत्या, त्यांबद्दलही खात्री पटली. यहोवाकडून आशीर्वाद मिळालेल्या लोकांच्या जीवनात, शुद्ध उपासना महत्त्वपूर्ण स्थानी असणार होती.
या दृष्टान्तामुळे व्यवस्थेचं, सहकार्याचं आणि सुरक्षेचं वचन मिळालं
देशात भरपूर अन्न असणार होतं
प्रत्येक कुटुंबाला वारसा मिळणार होता
लोकांना जमिनीचा वाटा देण्याआधी, तिचा एक खास भाग यहोवाला ‘भेट’ म्हणून ‘वेगळा’ ठेवण्यात आला
माझ्या जीवनात यहोवाची उपासना प्रथम स्थानी असल्याचं मी कसं दाखवू शकतो? (टेहळणी बुरूज०६ ५/१ पृ. १५ परि. १३-१४)