ख्रिस्ती जीवन
देवाला आवडणारे गुण विकसित करा—नम्रता
या गुणाचं महत्त्व:
नम्र असल्यामुळे यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी मदत होते.—स्तो १३८:६
नम्र असल्यामुळे इतरांसोबत चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.—फिलि २:३, ४
गर्विष्ठपणाचे परिणाम खूप वाईट असतात. —नीत १६:१८; यहे २८:१७
हा गुण कसा विकसित कराल:
सल्ला मागा आणि तो लागू करण्याचा प्रयत्न करा.—स्तो १४१:५; नीत १९:२०
दुसऱ्यांसाठी अशी कामं करायला तयार असा ज्यांना सहसा कमी लेखलं जातं.—मत्त २०:२५-२७
आपल्याकडे असलेल्या कौशल्यांमुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे येणारा गर्व टाळा.—रोम १२:३
मी कोणकोणत्या मार्गांनी आणखी जास्त नम्रता दाखवू शकतो?
यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—गर्विष्ठपणा, हा व्हिडिओ पाहा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या:
सल्ला मिळाल्यावर आपण जी प्रतिक्रिया दाखवतो त्यावरून आपल्याबद्दल काय दिसून येतं?
प्रार्थनेमुळे आपल्याला नम्रता विकसित करण्यासाठी कशी मदत होते?
नम्रता दाखवण्याचे काही मार्ग कोणते आहेत?