वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जुलै पृ. ८
  • दारासमोर उभे असताना चांगली वागणूक ठेवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दारासमोर उभे असताना चांगली वागणूक ठेवणे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • दारात उभे राहून व टेलिफोनवरून प्रगतीशील बायबल अभ्यास घेणे
    आमची राज्य सेवा—२००६
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—देवाकडून आनंदाची बातमी! माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • दारात उभे राहून व टेलिफोनवर बायबल अभ्यास सुरू करणे
    आमची राज्य सेवा—२००५
  • शिष्टाचार—देवाच्या लोकांचा खास गुण
    आमची राज्य सेवा—२००१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जुलै पृ. ८

ख्रिस्ती जीवन

दारासमोर उभे असताना चांगली वागणूक ठेवणे

सेवाकार्य करताना दारासमोर उभे असताना, एक बांधव खिडकीतून डोकावून पाहत आहे, एक बांधव काही खात आहे आणि एक बांधव मेसेज पाठवत आहे

आपण ख्रिस्ती या नात्याने जगापुढे, “रंगमंचावरील” कलाकारांप्रमाणे आहोत. त्यामुळे लोकांचं आपल्यावर नेहमी लक्ष असतं. (१कर ४:९) म्हणून, प्रचारकार्यात असताना काही घरमालक जेव्हा आपल्याला खिडकीतून पाहतात किंवा दाराआड उभे राहून आपलं बोलणं ऐकतात, तेव्हा आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही. दारावर येणाऱ्‍या व्यक्‍तीला पाहण्यासाठी, तिचं बोलणं ऐकण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी आजकाल काही घरांना कॅमेरा आणि मायक्रोफोन लावलेला असतो. त्यामुळे दारासमोर उभे असताना आपली वागणूक चांगली असली पाहिजे. याचे काही मार्ग पुढे दिले आहेत. —२कर ६:३.

आपल्या आचरणाद्वारे (फिलि १:२७):

  • घरमालकाचा आदर करा; घराच्या आत डोकावून पाहू नका. दारासमोर उभे असताना खाणं-पिणं, फोन करणं किंवा मेसेज पाठवणं अशा गोष्टी टाळा

आपल्या बोलण्याद्वारे (इफि ४:२९):

  • दारासमोर उभे असताना एकमेकांशी असं काहीही बोलू नका, जे घरमालकाला ऐकू गेल्यावर त्याला आवडणार नाही. काही प्रचारक घरमालकाशी बोलण्याआधी आपल्या सोबत्याशी बोलण्याचं पूर्णपणे थांबवतात. यामुळे घरमालकाशी काय बोलावं यावर विचार करायला त्यांना मदत होते

सेवाकार्यादरम्यान घरमालक दारातून पाहत असताना, दोन बांधव शांतपणे दारासमोर उभे आहेत

दारासमोर उभे असताना, तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी चांगली वागणूक ठेवू शकता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा