जून—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
५-११ जून
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ५१-५२
“यहोवाच्या वचनातील प्रत्येक गोष्ट तंतोतंत पूर्ण होते”
(यिर्मया ५१:११) “बाण पाजवा; ढाली धारण करा; परमेश्वराने मेद्यांच्या राजास स्फूर्ति दिली आहे. नाश करावा याची त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.”
(यिर्मया ५१:२८) “त्याजविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा.”
इन्साइट-२ पृ. ३६० परि. २-३
मेदी
मेदींनी बाबेलला पारसींसोबत मिळून हरवलं. इ.स.पू. आठव्या शतकात यशया संदेष्ट्याने भविष्यवाणी केली होती, की यहोवा मेदी लोकांना बाबेलविरुद्ध उठवेल. “ते रुप्याची परवा करणार नाहीत व सोन्याने खुश होणार नाहीत. त्यांची धनुष्ये तरुणांस पाडतील.” (यश १३:१७-१९; २१:२) इथे “मेदी” लोकांचा जो उल्लेख केला आहे त्यात पारसी लोकांचासुद्धा समावेश होतो. प्राचीन काळातले ग्रीक इतिहासकारांनी “मेदी” या शब्दाचा वापर मेदी आणि पारसी या दोघांसाठी केला. बाबेलवर हल्ला करून सोनं-चांदी मिळवणं नाही, तर बाबेलवर विजय मिळवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. म्हणून त्यांच्याविषयी म्हटलं आहे, की त्यांना सोन्या-चांदीची परवा नव्हती. बाबेलवर विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता; त्यांना लाच किंवा भेटी देऊन तो बदलता येणार नव्हता. पारसींप्रमाणेच मेदींचंसुद्धा मुख्य शस्त्र धनुष्य होतं. त्यांचे धनुष्य लाकडी असून कधीकधी त्यांवर तांबा किंवा कांस्य या धातूंचा थर लावला जायचा. (स्तो १८:३४, NW पडताळून पाहा.) ते धार लावलेल्या बाणांचा वापर करायचे ज्यामुळे ते बाण शरीरात खोलवर रुतायचे. बाणांचा वर्षाव करून त्यांनी बाबेलच्या तरुणांना मारून टाकलं.—यिर्म ५१:११.
यिर्मयाने म्हटलं, की “मेद्यांचे राजे” बाबेलवर हल्ला करतील. (यिर्म ५१:११, २८) त्याने “राजे” या अनेक वचनी शब्दाचा वापर केला. यावरून कळतं की कोरेशच्या खालोखाल मेद्यांचा राजा किंवा राजे यांचादेखील बाबेलवर हल्ला करणाऱ्यांमध्ये समावेश होता. राजाच्या खालोखाल आणखी राजे असणं, ही त्या काळी एक सामान्य रीत होती. (यिर्म २५:२५ पडताळून पाहा.) मेदी, एलाम, पारसी आणि आसपासच्या इतर गोत्रांनी मिळून बाबेलवर हल्ला केला. असं असलं तरी, दारयावेश नावाचा मेदी याला “खासद्यांच्या देशावर राजा” म्हणून नेमण्यात आलं. कोरेश या पारसी राजानेच त्याला नेमलं असावं.—दान ५:३१; ९:१.
(यिर्मया ५१:३०) “बाबेलाचे वीर लढाई करावयाचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.”
इन्साइट-२ पृ. ४५९ परि. ४
नबोनायडस
बाबेलवर ज्या रात्री हल्ला झाला त्याविषयी नबोनायडस क्रॉनिकल या दगडी पाटीवर असं म्हटलं आहे: “कोरेशची सेना लढाई न करताच बाबेल शहरात शिरली.” ही गोष्ट दाखवते, की “बाबेलाचे वीर लढाई करायाचे थांबले आहेत” असं जे यिर्मयाने म्हटलं ते खरं ठरलं.—यिर्म ५१:३०.
(यिर्मया ५१:३७) “बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय व उपहास यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.”
(यिर्मया ५१:६२) “आणि म्हण, हे परमेश्वरा, तू या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशू राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.”
इन्साइट-१ पृ. २३७ परि. १
बाबेल
इ.स.पू. ५३९ नंतर बाबेलचं ऐश्वर्य हळूहळू कमी होऊ लागलं. पारसी राजा दारयावेश पहिला, याच्याविरुद्ध दोनदा बाबेलने बंड केला. जेव्हा बाबेलने दुसऱ्यांदा बंड केला तेव्हा त्याचा नाश करण्यात आला. पुढे शहराच्या एका भागाचं पुनर्वसन झालं. तिथे राहणाऱ्यांनी अहश्वेरोशविरुद्ध बंड केला आणि म्हणून त्यांना लुटण्यात आलं. थोर सिकंदरने बाबेलला त्याची राजधानी करण्याचं ठरवलं होतं, पण इ.स.पू. ३२३ मध्ये अचानक त्याचा मृत्यू झाला. मग इ.स.पू. ३१२ मध्ये निकेटर याने ते शहर काबीज केलं आणि तिथल्या बऱ्याचशा वस्तू टिग्रिस नदीकाठी पाठवल्या. त्यांचा वापर त्याने सेल्युशिया या त्याच्या नवीन राजधानीच्या बांधकामासाठी केला. बाबेल शहर पहिल्या शतकातही अस्तित्वात होतं आणि काही यहूदी लोक तिथं राहत होते. म्हणून प्रेषित पेत्र बाबेलला गेला होता. ही गोष्ट त्याच्या पत्रावरून कळतं. (१पेत्र ५:१३) बाबेलमध्ये बआलचं मंदिर इ.स. ७५ पर्यंत होतं, हे तिथे सापडलेल्या लेखांवरून कळतं. चौथ्या शतकापर्यंत ते शहर धुळीस मिळालं होतं आणि काही काळानंतर त्याचं अस्तित्व नाहीसं झालं. दगडांच्या ढिगाऱ्याशिवाय तिथे काहीच उरलं नाही.—यिर्म ५१:३७.
आध्यात्मिक रत्नं शोधा
(यिर्मया ५१:२५) “हे सर्व पृथ्वीचा नाश करणाऱ्या विध्वंसगिरी पाहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर उगारेन, तुझा कडेलोट करेन, जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करेन.”
इन्साइट-२ पृ. ४४४ परि. ९
डोंगर, पर्वत
पर्वत सरकारांना सूचित करतं. बायबलमध्ये पर्वत किंवा डोंगर हे राज्य किंवा शासन करणाऱ्या सरकारांना सूचित करतं. (दान २:३५, ४४, ४५; पुढील वचनंसुद्धा पडताळून पाहा, यश ४१:१५; प्रक १७:९-११, १८) बाबेलने त्याच्या सैन्यदलाचा वापर करून इतर राष्ट्रांना धुळीस मिळवलं आणि त्यामुळे त्याला विध्वंसगिरी किंवा नाश करणारे पर्वत असं म्हटलं आहे. (यिर्म ५१:२४, २५) यहोवा युद्ध करणाऱ्या पुरुषांविरुद्ध जे कार्य करतो त्याला एका स्तोत्रात “तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस” असं म्हटलं आहे. (स्तो ७६:४) लुटीने भरलेलं पर्वत कदाचित आक्रमक राज्यांना सूचित करतं. (नहू २:११-१३ पडताळून पाहा.) यहोवाविषयी दावीद म्हणाला: “हे परमेश्वरा, तू . . . माझा पर्वत खंबीर केला.” यहोवाने दावीदचं राज्य उंचावलं आणि दृढपणे स्थापित केलं असा याचा अर्थ असू शकतो. (स्तो ३०:७; पुढचं वचनसुद्धा पडताळून पाहा, २शमु ५:१२) पर्वत राज्याला किंवा सरकाराला सूचित करतं, ही गोष्ट आपल्याला प्रकटीकरण ८:८ मध्ये जे म्हटलं आहे ते समजायला मदत करते. तिथे म्हटलं आहे: “आगीने पेटलेल्या मोठ्या पर्वतासारखे काहीतरी.” हे वचन अशा एका सरकाराला सूचित करतं जे आगीसारखं विध्वंसक आहे.
(यिर्मया ५१:४२) “समुद्र बाबेलावर लोटला आहे; त्याच्या लाटांच्या समुदायाने तो झाकून गेला आहे.”
इन्साइट-२ पृ. ८८२ परि. ३
समुद्र
सैन्यांचा मोठा समुदाय. बाबेलवर हल्ला करणाऱ्यांच्या आवाजाबद्दल यिर्मयाने म्हटलं की “ते सागराप्रमाणे गर्जना करतात.” (यिर्म ५०:४२) बाबेलवर समुद्र येईल अशी जेव्हा त्याने भविष्यवाणी केली, तेव्हा मेदी आणि पारसी यांची मोठी सेना एका पुराप्रमाणे बाबेलवर हल्ला करेल असा त्याचा अर्थ होता.—यिर्म ५१:४२; पुढचं वचनसुद्धा पडताळून पाहा, दान ९:२६.
१२-१८ जून
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | विलापगीत १-५
“वाट पाहत राहण्याच्या मनोवृत्तीमुळे आपल्याला धीर धरण्यास मदत मिळते”
(विलापगीत ३:२१) “हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे.”
(विलापगीत ३:२४) “परमेश्वर माझा वतनभाग आहे असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवेन.”
टेहळणी बुरूज१२ ६/१ पृ. १४ परि. ३-४
तुझा जीव माझ्यासाठी वाकेल
संकटादरम्यान यिर्मयाकडे आशा होती. त्याच्या मनात कुठलीच शंका नव्हती. त्याला खात्री होती, की यहोवा त्याला आणि इतर पश्चात्तापी सेवकांना विसरणार नाही.
यिर्मयाकडे पक्की आशा असल्यामुळे त्याला दुःखात असतानासुद्धा सांत्वन मिळालं. यहोवा आपल्या पश्चात्तापी सेवकांना वाचवेल तोपर्यंत विश्वासूपणे यहोवावर विसंबून राहण्याचा यिर्मया संदेष्ट्याने निर्धार केला होता.—विल. ३:२१.
१९-२५ जून
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल १-५
“देवाचा संदेश सांगण्यात यहेज्केलला आनंद मिळाला”
(यहेज्केल २:९–३:२) “मी पाहिले तो मजकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता; तो त्याने मजपुढे पसरला; त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत यांविषयीचा लेख होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लावले.”
इन्साइट-१ पृ. १२१४
आतड्या
अन्न आतड्यांमध्ये गेल्यावर त्याचे पचन होते. त्याच प्रकारे यहेज्केलला दृष्टांतात गुंडाळी खाण्यास सांगितली होती जी त्याच्या आतड्यांमध्ये जाणार होती. त्यात जे लिहलं होतं, त्यावर मनन करून ते लक्षात ठेवण्याद्वारे यहेज्केलला आध्यात्मिक शक्ती मिळणार होती. ही क्रिया मानसिक किंवा आध्यात्मिक पचनक्रियेला सूचित करते. असं केल्यामुळे त्याला आध्यात्मिक पोषण मिळालं व इतरांना सांगण्यासाठी एक संदेशसुद्धा मिळाला.—यहे ३:१-६; पुढचं वचनसुद्धा पडताळून पाहा, प्रक १०:८-१०.