वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 मार्च पृ. ५
  • देवाचे ऐका—कसं वापराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे ऐका—कसं वापराल?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे ऐकण्यास लोकांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • देवाच्या अपेक्षा शिकण्यास लोकांना मदत करणारे नवीन साधन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या नवीन साधनाचा सेवाकार्यात वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 मार्च पृ. ५

ख्रिस्ती जीवन

देवाचे ऐका—कसं वापराल?

देवाचे ऐका

ज्यांना लेखी भाषा समजणं कठीण जातं त्यांना बायबलची मूलभूत सत्यं चित्रांद्वारे समजवता यावी, यासाठी देवाचे ऐका या माहितीपत्रकाची रचना करण्यात आली. प्रत्येक दोन पानांच्या धड्यात खूप विचारपूर्वक रेखाटलेली चित्रं आहेत आणि एका चित्राकडून दुसऱ्‍या चित्राकडे जाण्यासाठी खुणा दिल्या आहेत, ज्यामुळे चर्चा करण्यासाठी मदत मिळते.

देवाचे ऐका व देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या दोन्ही माहितीपत्रकात सारखीच चित्र आहेत. पण देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकात देवाचे ऐका पेक्षा जास्त लिखित माहिती आहे. ज्यांना थोडं लिहिता-वाचता येतं, त्यांच्याबरोबर आपण देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकातून चर्चा करू शकतो. जेव्हा विद्यार्थ्यांचा अभ्यास देवाचे ऐका यातून घेतला जातो तेव्हा अभ्यास घेणारे स्वतः देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! हे माहितीपत्रक सहसा वापरतात. यातल्या बऱ्‍याच पानांवर चौकटी आहेत, जिथे अधिक माहिती दिली आहे. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आपण त्यावर चर्चा करू शकतो.

एक बहीण देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकातून अभ्यास घेत आहे आणि विद्यार्थी देवाचं ऐका हे माहितीपत्रक पाहत आहे

तुम्ही ही दोन्ही माहितीपत्रकं कोणत्याही महिन्यात सादर करू शकता, म्हणजे जरी ती त्या महिन्याची सादरता नसली तरीही. बायबल अभ्यास घेताना माहितीपत्रकातल्या चित्रांचा उपयोग करून, बायबलमध्ये देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेले अहवाल समजवा. विद्यार्थ्याला चर्चेत सामील करण्यासाठी त्याला प्रश्‍न विचारा आणि त्याला विषय समजत आहे याची खात्री करा. प्रत्येक पानाच्या शेवटी दिलेली शास्त्रवचनं वाचा आणि त्यावर चर्चा करा. या माहितीपत्रकावर चर्चा करून झाल्यावर तुम्ही बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातून चर्चा करू शकता, ज्यामुळे तुम्ही विद्यार्थ्याला बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी मदत करू शकता.

एदेन बागेतल्या आदाम आणि हव्वा यांच्याबद्दल देवाचे ऐका यातला धडा
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा