वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. ८
  • तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्‍वास ठेवायला मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्‍वास ठेवायला मदत करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • पुरावे तपासून पाहा
    सावध राहा!—२०२१
  • कुटुंबासाठी अधिक मदत
    सावध राहा!—२०१८
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. ८

ख्रिस्ती जीवन

तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्‍वास ठेवायला मदत करा

सृष्टी यहोवाची महिमा करते. (स्तो. १९:१-४; १३९:१४) पण जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल सैतानाचं जग, आपल्याला जे सिद्धांत शिकवतं त्यामुळे देवाची निंदा होते. (रोम. १:१८-२५) अशा कल्पना तुमच्या मुलांच्या मनात किंवा हृदयात रुजू नये यासाठी तुम्ही काय करू शकता? यहोवा अस्तित्वात आहे आणि तो वैयक्‍तिक रितीने तुमच्या मुलांची काळजी करतो, हा विश्‍वास वाढवण्यासाठी त्यांना लहानपणापासून मदत करा. (२ करिंथ. १०:४, ५; इफिस. ६:१६) त्यांना शाळेत, कॉलेजात काय शिकवलं जातं, याबद्दल त्यांच्या मनात कोणते विचार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच, त्यांच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साधनांचा वापर करा.—नीति. २०:५; याको. १:१९.

एक पिता आपल्या मुलांना निर्मितीबद्दल शिकवत आहे; शाळेत उत्क्रांतीवादाबद्दल शिकवलं जात आहे; तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का?

तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? हा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्‍न विचारा:

  • देवाच्या अस्तित्वाबद्दल एक कोणता सर्वसामान्य गैरसमज आहे?

  • तुमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये याबद्दल काय शिकवलं जातं?

  • यहोवा अस्तित्वात आहे, यावर तुमचा पक्का विश्‍वास का आहे?

  • देवाने सर्वकाही निर्माण केलं हे समजण्यास तुम्ही इतरांना कशी मदत कराल?

इतर साधनंही उपलब्ध आहेत:

• व्हिडिओ, यहोवाचे मित्र बना—‘यहोवानं सर्वकाही निर्माण केलं’

• सावध राहा! नियतकालिकातील “उत्क्रांती की निर्मिती?” ही मालिका

• तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं या माहितीपत्रकातील प्रश्‍न ९, मी उत्क्रांतिवादावर विश्‍वास ठेवायला हवा का?

• JW.ORG मालिका “माय बायबल लेसन्स” (तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी)

• JW.ORG वर्कशीट “वाय डू आय बिलीव इन गॉड?”

• JW ब्रॉडकास्टिंग व्हिडिओ “व्ह्यूपॉइंट्‌स ऑन द ओरीजीन ऑफ लाईफ”

• व्हिडिओ, द वंडर्स ऑफ क्रियेशन रीवील गॉड्‌स ग्लोरी

• माहितीपत्रक, वॉज लाईफ क्रियेटेड?

• पुस्तक, इज देर ए क्रियेटर हू केयर्स अबाउट यू?

द ओरीजीन ऑफ लाईफ—फाईव क्वेश्‍चन्स वर्थ आस्कींग

हे माहितीपत्रक खासकरून अशा तरुणांकरता तयार करण्यात आलं आहे, ज्यांना शाळेत उत्क्रांतिवाद शिकवण्यात येतो. सृष्टिकर्ता आहे याबद्दल ज्यांना आणखी पुरावा हवा असतो, अशांना देखील हे माहितीपत्रक दिलं जाऊ शकतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा