वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१५ पृ. २
  • ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही ऑडिओ बायबलचा चांगला फायदा करून घेत आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • दररोज बायबल वाचायला कशामुळे मदत होऊ शकते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?
    सावध राहा!—२०१९
  • आपली अधिकृत वेबसाईट—दुसरी भाषा बोलणाऱ्‍याला मदत करण्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ११/१५ पृ. २

ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?

१. आपल्या छापील प्रकाशनांव्यतिरिक्‍त आपल्यासाठी आणखी कशाची सोय करण्यात आली आहे ज्याचा आपल्याला फायदा होईल?

१ आपल्यातील बरेच जण jw.org या आपल्या वेबसाईटवरून सत्याची मनोहर वचनं वाचण्याचा आनंद लुटत आहेत. (उप. १२:१०) पण तुम्ही कधी या वेबसाईटवरील ऑडिओ रेकॉर्डिंग्स ऐकले आहेत का? या रेकॉर्डिंग्समुळं आपण आपल्या वेबसाईटवरील बरीच माहिती ऐकू शकतो. यांचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?

२. वैयक्‍तिक किंवा कौटुंबिक अभ्यासादरम्यान आपण ऑडिओ रेकॉर्डिंग्सचा उपयोग कसा करू शकतो?

२ वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी: प्रवास करताना किंवा दररोजची कामं करता-करता आपण बायबल, नियतकालिकं किंवा एखाद्या प्रकाशनाचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून वेळेचा सदुपयोग करू शकतो. (इफिस. ५:१५, १६) कौटुंबिक उपासनेदरम्यान, आपण चर्चा करत असलेल्या प्रकाशनातून पाहत-पाहत त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकल्यानं कौटुंबिक उपासनेत नाविन्य येऊ शकतं. आपण आपलं वाचन सुधारत असू किंवा एखादी नवीन भाषा शिकत असू तर वैयक्‍तिक अभ्यासात ऑडिओ रेकॉर्डिंग्सचा उपयोग केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.

३. आपल्या क्षेत्रातील कोणकोणत्या लोकांना ऑडिओ रेकॉर्डिंग्सचा फायदा होऊ शकतो?

३ सेवेत: सेवेत आपल्याला असे लोक भेटतात जे म्हणतात त्यांना प्रकाशनं वाचत बसायला वेळ नाही. असे लोक कदाचित आपले रेकॉर्डिंग्स ऐकायला तयार होतील. किंवा कदाचित आपण अशा एखाद्या व्यक्‍तीला भेटू जी वेगळी भाषा बोलते आणि तिच्या “भाषेत” राज्याचा संदेश ऐकवला तर कदाचित ती आवड दाखवेल. (प्रे. कृत्ये २:६-८) काही देशांतील संस्कृतीत ऐकण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. जसं की, ह्‍माँग संस्कृतीतील लोक सहसा, तरुण पिढीला त्यांचा इतिहास तोंडी सांगतात. आणि ऐकलेल्या गोष्टी या तरुण पिढीच्या लक्षात राहतात. तसंच, अनेक आफ्रिकन संस्कृतींतसुद्धा गोष्टींचं कथन करून मुलांना शिकवलं जातं.

४. क्षेत्रातील लोकांना मदत करताना आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतो?

४ आपल्या क्षेत्रात आपण, घरमालकाच्या भाषेतील एखादं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवल्यास फायदा होऊ शकेल का? आपण कुणाला ई-मेलद्वारे ऑडिओ रूपात असलेलं प्रकाशनं पाठवल्यास त्याला फायदा होऊ शकेल का? आवड दाखवलेल्या घरमालकाला आपण, एखादं छापील प्रकाशन आणि त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग सीडीवर डाऊनलोड करून देऊ शकतो का? अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपण क्षेत्रात लोकांना देत असलेलं पुस्तक, माहितीपत्रक, नियतकालिक किंवा पत्रिका यांचा रिपोर्ट टाकू शकतो. ऑडिओ रेकॉर्डिंग्सचा वैयक्‍तिक अभ्यासासाठी आणि राज्याचे बीज पेरण्यासाठीदेखील उपयोग केला जाऊ शकतो.—१ करिंथ. ३:६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा