ऑक्टोबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा
५ ऑक्टोबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ५४ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा भाग ५, कथा ७७ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ इतिहास १-४ (८ मि.)
क्र. १: १ इतिहास १:२८-४२ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: एली—विषय: अयोग्य वर्तन खपवून घेतल्याने देवाचा अनादर होतो—१शमु २:१२-१७, २२-२५, २९; ४:२-१८ (५ मि.)
क्र. ३: तारणासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक—बायबल विषय ३०ख (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष द्या.—प्रे. कृत्ये २०:२४.
१० मि: ऑक्टोबर महिन्यादरम्यान नियतकालिकं सादर करा. चर्चा. सुरुवातीलाच एक प्रात्यक्षिक दाखवा. यात प्रचारक नमुना सादरीकरणाचा वापर करतो. त्यानंतर, नमुना सादरीकरणावर सविस्तर चर्चा करा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: सूचनांचं पालन कसं केलं? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—व्यापारी क्षेत्रात प्रचार कार्य करा” या लेखातील सूचना लागू केल्यानं श्रोत्यांना झालेले फायदे आणि त्यांना आलेले चांगले अनुभव विचारा.
गीत ४४ आणि प्रार्थना