घोषणा
◼ साहित्य सादरता सप्टेंबर आणि ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकं. नोव्हेंबर आणि डिसेंबर: मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (T-16), शांतीदायक नवीन जगातील जीवन (T-15), कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (T-21), किंवा सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (T-27) या जुन्या पत्रिकांपैकी कोणतीही एक सादर करू शकता. जुन्या पत्रिका उपलब्ध नसल्यास खालीलपैकी कोणतीही पत्रिका वापरून तुम्ही बायबल अभ्यास सुरू करू शकता: मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?, कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? किंवा दुःख कधी संपेल का? पुढं मग देवाकडून आनंदाची बातमी! किंवा बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातून बायबल अभ्यास चालू ठेवा.
◼ सन २०१६ च्या स्मारकविधीच्या काळात होणारं खास जाहीर भाषण २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सप्ताहात दिलं जाईल. भाषणाचा विषय नंतर कळवण्यात येईल. त्या आठवडी एखाद्या मंडळीला विभागीय पर्यवेक्षक भेट देत असतील किंवा त्या मंडळीचं संमेलन असेल तर अशा मंडळ्यांमध्ये ते भाषण पुढच्या आठवडी देण्यात यावं. कोणत्याही मंडळीत हे खास भाषण २८ मार्च आधी दिलं जाऊ नये.
◼ आपली राज्य सेवा, नोव्हेंबर २०१४, पृष्ठ ५, परि. २२ ते २४ यात दिलेल्या सूचनेनुसार मंडळीच्या सेवा समितीनं सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याचा आढावा घ्यावा.
◼ मंडळीतून बहिष्कृत झालेले किंवा मंडळी सोडून गेलेले यांपैकी जर कुणाला मंडळीत परत यायची इच्छा असेल तर अशांना मदत करण्यासाठी वडिलांनी टेहळणी बुरूज, १ फेब्रुवारी १९९२, पृष्ठे १७ ते १९ यातील सूचनांनुसार पावलं उचलावीत अशी त्यांना आठवण करून देण्यात येत आहे.