सप्टेंबर २८ च्या सप्ताहाचा आराखडा
२८ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १६ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ७६ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ राजे २३-२५ (८ मि.)
क्र. १: २ राजे २३:८-१५ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: येशू देवाचा पुत्र आणि नियुक्त राजा आहे—बायबल विषय ३०क (५ मि.)
क्र. ३: एलाजार—विषय: यहोवाची सेवा दृढनिश्चयाने करा—गण १३:४-१६; १४:२६-३०; २०:२५-२८; २७:१८-२३; ३३:३७-३९ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष द्या.—प्रे. कृत्ये २०:२४.
१० मि: पौल आणि त्याचे साथीदार फिलिप्पैमध्ये अगदी पूर्णपणे साक्ष देतात. चर्चा. श्रोत्यांकडून प्रे. कृत्ये १६:११-१५ वाचून घ्या. हा अहवाल सेवाकार्यात आपल्याला कशी मदत करू शकतो यावर चर्चा करा.
२० मि: “आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून लोकांना शिकवणं.” श्रोत्यांबरोबर चर्चा. परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर चांगली तयारी केलेलं एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यात एक प्रचारक आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून घरमालकासोबत एका परिच्छेदावर चर्चा करतो.
गीत ३७ आणि प्रार्थना