सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—व्यापारी क्षेत्रात प्रचार कार्य करा
हे का महत्त्वाचं: कित्येक लोक कामासाठी दिवसातील अनेक तास घराबाहेर असतात. अशा लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहचवायचा असेल तर आपण त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटू शकतो. व्यापारी क्षेत्रात प्रचार कार्य केल्यानं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि चांगले परिणामही मिळू शकतात. कारण घरोघरच्या कार्यामध्ये बरीच घरं बंद असू शकतात पण व्यापारी क्षेत्रात शक्यतो दुकानं बंद नसतात. आणि दुकानात काम करणारे लोक, गिऱ्हाईक मिळवण्यासाठी सर्वांबरोबर चांगलं वागतात. या क्षेत्रात चांगले परिणाम मिळवण्यासाठी प्रचारकांनी व्यवहारकुशलतेनं वागलं पाहिजे आणि त्यांचा पेहराव सभ्य असला पाहिजे. (२ करिंथ. ६:३) म्हणून व्यापारी क्षेत्रात किती वेळा आणि कोण-कोण प्रचार कार्य करत आहे यावर सेवा पर्यवेक्षकांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
तुमच्या कौटुंबिक उपासनेत, व्यापारी क्षेत्रात कसं बोलावं याचं एक छोटंसं सादरीकरण तयार करून त्याचा सराव करा. अशा क्षेत्रात तुम्हाला कार्य करण्याची संधी मिळाली तर तुम्ही या सादरीकरणाचा उपयोग करू शकता.