नमुना सादरीकरण
सावध राहा! जुलै - सप्टेंबर
“आज बहुतेक लोकांना काही न् काही आजार आहेत. पण आम्ही सर्व लोकांना एक आशादायक संदेश सांगत आहोत. आपण जर कधी आजारीच पडलो नाही तर आपलं जीवन कसं असेल असं तुम्हाला वाटतं? [उत्तरासाठी थांबा.] शास्त्रात एक वचन दिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकाला आवड असेल तर यशया ३३:२४क वाचा.] पण ही भविष्यवाणी पूर्ण होईपर्यंत आपण आपल्या तब्येतीची काळजी कशी घेऊ शकतो त्याबद्दलच्या पाच गोष्टी या नियतकालिकात सुचवल्या आहेत.”