नमुना सादरीकरण
जानेवारी - मार्च
“आजकाल आजारांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. आम्हाला काळजी वाटत असल्यामुळं आम्ही सर्वांची भेट घेत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चार लोकांपैकी एकाला तरी त्याच्या जीवनात कधी न कधी नैराश्यासारखा मनोविकार होतो. आजकाल मानसिक आजार सर्वसामान्य झाले आहेत, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला शास्त्रातून एक वचन वाचून दाखवलं तर चालेल का? या वचनात भविष्यातील आशादायक परिस्थितीविषयी सांगितलं आहे जेव्हा आजारपण व दुःख यांतून लोक मुक्त झालेले असतील. [घरमालकानं होकार दिला तर प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] या नियतकालिकात मानसिक आजारांविषयी काही माहिती दिली आहे जिचा आपल्याला फायदा होऊ शकतो.”