जुलै २७ च्या सप्ताहाचा आराखडा
२७ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३४ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ६३ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे १५-१७ (८ मि.)
क्र. १: १ राजे १५:१६-२४ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बायबलमधील सल्ल्याचा पत्नींना फायदा कसा होऊ शकतो?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २६ परि. ३-४ (५ मि.)
क्र. ३: दावीद—विषय: तरुणांनो, धैर्याने यहोवाची सेवा करण्यास आत्ता तयार व्हा—१शमु १३:१४; १६:१-१३, १८; १७:२६-५४; २शमु ७:८; २इति ७:६; २९:२६, २७ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “तुम्ही जाऊन ... शिष्य करा.”—मत्त. २८:१९, २०.
१० मि: सेवेतील तुमची कौशल्ये तुम्ही सुधारत आहात का? चर्चा. आपली राज्य सेवा फेब्रुवारी २०१४ अंकातील “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी” या शृंखलेच्या पहिल्या परिच्छेदात, ही शृंखला का तयार करण्यात आली आहे त्याबद्दल सांगितलं आहे. तर या उद्देशाची तसंच या शृंखलेतील मागील काही भागांची थोडक्यात चर्चा करा. शृंखलेत सुचवण्यात आलेल्या गोष्टींचा कोणता विशिष्ट फायदा झाला ते श्रोत्यांना विचारा. दर महिन्याच्या शृंखलेत, “या महिन्यादरम्यान हे करून पाहा” या शीर्षकाखाली सुचवण्यात आलेल्या गोष्टीकडं विशेष लक्ष देण्याचं श्रोत्यांना उत्तेजन द्या.
१० मि: बायबल विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी “देवाच्या वचनाची प्रस्तावना” पुस्तिकेचा उपयोग करा. चर्चा. पुस्तिकेतील वैशिष्ट्यांद्वारे आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला बायबलचा उपयोग करण्यास कशी मदत करू शकतो त्यावर चर्चा करा: (१) “बायबलमधील वचने शोधण्याचा सोपा मार्ग.” (२) प्रश्न १९: “बायबलमधील पुस्तकांत कोणती माहिती दिली आहे?” (३) प्रश्न २०: “बायबल वाचनाचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता?” एक प्रचारक आपल्या बायबल विद्यार्थ्याबरोबर अभ्यासानंतर वरील पैकी एका वैशिष्ट्याची चर्चा करत आहे, याचं थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: “आपली शिकवण्याची साधनं.” प्रश्न व उत्तरं.
गीत ४३ आणि प्रार्थना