वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१५ पृ. ४-६
  • प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”
    आमची राज्य सेवा—२०१४
  • देवाचा गौरव करणारे आचरण
    आमची राज्य सेवा—२०१३
  • तीन दिवसांचा आध्यात्मिक तजेला
    आमची राज्य सेवा—२०११
  • आपली प्रांतीय अधिवेशने—सत्याची जोरदार साक्ष देतात
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ७/१५ पृ. ४-६

प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना

  • कार्यक्रमाची वेळ: सभागृहाचे दरवाजे सकाळी ८ वाजता उघडले जातील. तिन्ही दिवशी सुरुवातीचं संगीत सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. संगीत सुरू होतं तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावं जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीनं होईल. समारोपाचं गीत आणि प्रार्थना शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ५:०० वाजता आणि रविवारी ४:०० वाजता होईल.

  • गीत गाऊन यहोवाचं स्तवन करा: प्राचीन काळातील लोक गीत गाऊन यहोवाची स्तुती करत असत. आजही खऱ्‍या उपासनेत संगीताला तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. (स्तो. २८:७) त्यामुळं प्रांतीय अधिवेशनात सकाळचा आणि दुपारचा कार्यक्रम सुरू होण्याआधी संगीत असतं. हे संगीत आपल्या मनोरंजनासाठी नव्हे तर, यहोवाचं ज्ञान घेण्यास व त्याची उपासना करण्यास आपलं मन तयार करण्यासाठी बनवण्यात आलं आहे. त्यामुळं, चेअरमन जेव्हा ‘थोड्याच वेळात संगीत सुरू होईल’ अशी घोषणा करतो तेव्हा आपण सर्वांनी बोलत बसण्याऐवजी आपापल्या जागेवर बसून ते संगीत लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. असं केल्यास आपण दाखवून देतो, की आपल्या संस्थेतील जे बांधव संगीत बनवतात त्यांच्या प्रयत्नांबद्दल आपण आभारी आहोत. वर्षातून दोनदा हे बंधुभगिनी स्वखर्चानं आपल्यासाठी सुरेल संगीत बनवण्यासाठी न्यूयॉर्कमधील पॅटरसन इथं येतात. म्हणून, हे संगीत लक्ष देऊन ऐका आणि कार्यक्रम सुरू होतो तेव्हा आपल्या राज्य गीतांद्वारे यहोवाची स्तुती करा.

  • पार्किंग: सभागृहाच्या अधिकाऱ्‍यांनी पार्किंगची जबाबदारी आपल्यावर सोपवली असल्यास, जसजशा गाड्या येतील तसतशी त्यांना पार्किंगसाठी जागा मोफत दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी असल्यामुळं होईल तितकं कारपूलींग करावं, म्हणजे प्रत्येकानं आपापली गाडी आणण्यापेक्षा दुसऱ्‍यांच्या गाडीत जागा असल्यास त्यांच्या गाडीतून प्रवास करावा. अपंग लोकांसाठी राखीव असलेल्या जागेत इतरांनी पार्किंग करू नये.

  • जागा राखून ठेवणं: दररोज सकाळी सभागृहाचे दरवाजे उघडले जातात तेव्हा सगळ्यात चांगली जागा मिळावी म्हणून कृपया पळापळ करू नका. आपण इतरांचं हित पाहून जी आत्मत्यागी मनोवृत्ती दाखवतो त्यामुळं आपण खरे ख्रिस्ती आहोत हे दिसून येतं आणि आपल्याला पाहणारे लोक देवाची स्तुती करण्यास प्रवृत्त होतात. (योहा. १३:३४, ३५; १ करिंथ. १३:५; १ पेत्र २:१२) तुमच्यासोबत राहत असलेल्यांसाठी किंवा तुमच्यासोबत एकाच कारमधून प्रवास करणाऱ्‍यांसाठी किंवा तुमच्या बायबल विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जागा राखून ठेवू शकता. तुम्ही बसणार नसलेल्या जागांवर तुमचं सामान ठेवू नका. असं केल्यास ज्यांना अजूनपर्यंत जागा मिळालेली नाही त्यांना रिकाम्या जागा दिसतील. वयोवृद्ध, आजारी आणि अपंग लोकांसाठी आरक्षित असलेल्या जागा कमी असल्यामुळं त्यांना मदत करणारे एक-दोन सदस्यच त्यांच्यासोबत बसू शकतात.

  • सभ्य पेहराव: अधिवेशनात आपण घालणार असलेला पेहराव उचित व सभ्य असला पाहिजे. जगात चाललेल्या फॅशनप्रमाणे तो नसावा. (१ तीम. २:९) लॉजवर राहायला जाताना किंवा लॉज सोडताना तसंच कार्यक्रम सुरू होण्याआधीच्या व नंतरच्या काळातसुद्धा आपले कपडे गबाळे असू नयेत. जेणेकरून आपल्याला अधिवेशनाचे बॅज कार्ड लावायला अभिमान वाटेल आणि संधी मिळेल तेव्हा साक्ष द्यायला लाज वाटणार नाही. आपल्या सभ्य पेहरावामुळं व चांगल्या आचरणामुळं प्रामाणिक मनाचे लोक यहोवाकडं आकर्षित होतील शिवाय त्याचं मनही आनंदित होईल.—सफ. ३:१७.

  • इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरताना इतरांचा विचार करा: कार्यक्रम चालू असतो तेव्हा इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्या मोबाईल फोनचं किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं सेटिंग ठेवून आपण दाखवून देऊ, की आपण इतरांचा विचार करतो. तुम्ही जर कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, टॅबलेट किंवा इतर उपकरणं वापरणार असाल तर इतरांचं लक्ष विचलित होईल अशा प्रकारे ती वापरू नका किंवा स्टेजवरील वक्‍ता त्यांना दिसणार नाही अशा प्रकारे ती ठेवू नका. कार्यक्रम चालू असतो तेव्हा विनाकारण मेसेजेस किंवा ई-मेल न पाठवण्याद्वारेही आपण इतरांचा विचार करू.

  • दुपारचं जेवण: अधिवेशनाचं ठिकाण सोडून बाहेर जेवायला जाण्याऐवजी कृपया घरूनच साधं जेवण घेऊन यावं. पाण्याचे कूलर किंवा जेवणाचा डबा आणल्यास सीटच्या खाली मावेल इतकाच तो लहान असावा. अधिवेशनाच्या ठिकाणी मोठमोठे कूलर किंवा जेवणाचे डबे आणि काचेची भांडी आणण्यास मनाई आहे.

  • दान: जगभरात चाललेल्या कार्यासाठी, अधिवेशनात ठेवलेल्या दानपेट्यांमध्ये स्वेच्छेनं दान टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. तुम्ही जर चेकद्वारे अनुदान देत असाल तर ते चेक “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केलं पाहिजे. काही ठराविक अधिवेशनांमध्ये तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे संस्थेला दान देऊ शकता.

  • औषधोपचार: तुम्ही नियमितपणे काही विशिष्ट औषधे घेत असाल, तर त्यांचा पुरेसा साठा सोबत घेऊन या; कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतील. जे बंधुभगिनी मधुमेहासाठी इंजेक्शन घेतात त्यांनी वापरलेले सिरिंज व सुया अधिवेशनातील किंवा हॉटेलमधील कचरा पेट्यांत टाकू नयेत, तर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.

  • वैयक्‍तिक सुरक्षा: घसरून किंवा अडखळून पडल्यामुळं होणाऱ्‍या दुखापती टाळण्यासाठी विशेष काळजी घ्या. अधिवेशन गृहात आपली मुलं पळापळी करत नाहीत, याची खबरदारी पालकांनी घ्यावी. योग्य प्रकारचे बूट किंवा चपला न घातल्यामुळं आणि खासकरून उंच टाचेच्या चपला घातल्यामुळं दरवर्षी अनेकांना दुखापती होतात. तेव्हा, योग्य मापाचे बूट किंवा चपला घाला; यामुळं अधिवेशनगृहात, पायऱ्‍यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावरून तुम्हाला सुरक्षितपणे चालता येईल.

  • बाबागाड्या आणि आरामखुर्च्या: अधिवेशनाच्या ठिकाणी बाबागाड्या आणि आरामखुर्च्या आणण्याची परवानगी नाही. पण आईवडील बाळांसाठी असलेल्या खास (चाईल्ड-सेफ्टी) सीट्‌स त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर ठेवू शकतात.

  • अत्तरं: बहुतेक अधिवेशनं बंद ठिकाणी होत असल्यामुळं यंत्राच्या साहाय्यानं हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळं ज्यांना श्‍वसनसंबंधित विकार आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून उग्र वासाची अत्तरं व परफ्यूम वापरण्याचं टाळावं. अशा प्रकारे काळजी घेण्याद्वारे आपण इतरांबद्दल प्रेम दाखवतो.—१ करिंथ. १०:२४.

  • प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म: अधिवेशनाच्या काळात अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर कोणी आवड दाखवली, तर त्या व्यक्‍तीबद्दलची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला जावा. पूर्णपणे भरलेला फॉर्म एकतर पुस्तक विभागाला किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतील सचिवाला दिला जाऊ शकतो.

  • रेस्टॉरंट: रेस्टॉरंटमध्ये असताना आपल्या उत्तम आचरणाद्वारे यहोवाच्या नावाचा गौरव करा. ख्रिस्ती सेवकाला शोभेल असा पेहराव करा. टिप देण्याची प्रथा असल्यास ती द्या.

  • हॉटेल:

    1. कृपया गरजेपेक्षा जास्त रूमचं आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका रूममध्ये राहण्याची परवानगी आहे तितक्याच लोकांनी त्यात राहावं.

    2. निकडीची परिस्थिती असल्याशिवाय बुकींग रद्द करू नका. रद्द करावं लागलंच तर लवकरात लवकर हॉटेलला कळवा, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्या राहण्याची सोय होऊ शकेल. (मत्त. ५:३७) आणि आवर्जून कॅनसल करण्याचा नंबर मागा.

    3. रूम बुक करताना तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर लक्षात ठेवा, की काही हॉटेल तुमच्या खात्यातील एक विशिष्ट रक्कम राखून ठेवतात. रूम बुकींगसाठी व त्यासोबतच काही नुकसान झाल्यास किंवा एखादा आकस्मिक प्रसंग उद्‌भवल्यास भरपाई करण्यासाठी या रकमेचा उपयोग केला जातो. या सर्व गोष्टींचा हिशोब चुकता झाल्याशिवाय तुम्ही त्या रकमेचा उपयोग करू शकणार नाही.

    4. सामान वाहून नेण्याची ट्रॉली (लगेज कार्ट) गरज असेल तेव्हाच घ्या आणि वापरून झाल्यावर लगेच परत करा म्हणजे इतर जण ती वापरू शकतील.

    5. हॉटेल कर्मचारी तुमचं सामान वाहून न्यायला मदत करत असतील तर त्यांना व हाऊसकीपरला टिप द्या.

    6. स्वयंपाक करण्याची परवानगी असेल तरच रुममध्ये स्वयंपाक करा.

    7. काही वेळा हॉटेलमध्ये राहणाऱ्‍यांना नाश्‍ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या गोष्टी मोफत दिल्या जातात. हॉटेलमध्ये असतानाच या गोष्टींचा फायदा घेतला जाऊ शकतो. अधिवेशनात त्या घेऊन जाण्याद्वारे हॉटेलनं केलेल्या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊ नका.

    8. हॉटेलच्या कर्मचाऱ्‍यांशी वागताना सर्व प्रसंगी आत्म्याचं फळ प्रदर्शित करा. त्यांना सहसा अनेक लोकांकडं लक्ष द्यावं लागतं. तेव्हा, आपण जर त्यांच्याशी दयाळूपणे, सहनशीलतेनं व समंजसपणे वागलो तर त्यांना बरं वाटेल.

    9. स्विमिंग पूल, लिफ्ट, लॉबी, जिम अथवा हॉटेलच्या परिसरात कुठंही असताना पालकांनी सर्व प्रसंगी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं.

    10. सुचवलेल्या हॉटेलांच्या यादीत दाखवलेलं रूमचं भाडं हे दर दिवसाचं भाडं असतं; त्यात टॅक्सचा समावेश नसतो. हॉटेलच्या कर्मचाऱ्‍यांनी तुमच्याकडं जास्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लगेच अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा.

    11. तुमच्या रूमसंबंधी काही समस्या निर्माण झाल्या तर अधिवेशनादरम्यान रूमिंग विभागाला याविषयी कळवा जेणेकरून ते तुम्हाला मदत करू शकतील.

  • स्वयंसेवा: अधिवेशनात काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधावा. १६ पेक्षा कमी वयाची मुलंदेखील पालकांच्या किंवा पालकांची अनुमती असलेल्या एखाद्या प्रौढ व्यक्‍तीच्या देखरेखीखाली काम करू शकतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा