वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१५ पृ. ७
  • आपली शिकवण्याची साधनं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपली शिकवण्याची साधनं
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • सत्य शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • संशोधनाची साधनं वापरा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ७/१५ पृ. ७

आपली शिकवण्याची साधनं

१. सर्व ख्रिस्ती प्रचारक कारागिराप्रमाणे कसे आहेत?

१ कारागीर वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वापरतात. काही हत्यारं खास कामांसाठी वापरली जातात तर काही नेहमीच वापरली जातात. अनुभवी कारागीरांकडं नेहमी वापरली जाणारी हत्यारं सहसा असतातच आणि यांचा ते अगदी कुशलतेनं वापर करतात. आपल्यातील प्रत्येकानं सेवेत कुशल असलं पाहिजे आणि देवाचं वचन इतरांना सांगताना त्याला “लाज” वाटू नये, असं प्रोत्साहन बायबलमध्ये देण्यात आलं आहे. (२ तीम. २:१५) आपल्याजवळ कोणतं असं साधन आहे जे सर्वात महत्त्वाचं आहे? ते आहे देवाचं वचन बायबल. “शिष्य” बनवण्यासाठी आपण या साधनाचा प्रामुख्यानं उपयोग करतो. (मत्त. २८:१९, २०) त्यामुळं, “सत्याचे वचन” कुशलपणे सांगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याजवळ इतरही साधनं आहेत ज्यांचा आपण लोकांना सत्य शिकवण्यासाठी सर्रासपणे उपयोग करतो. सर्व ख्रिश्‍चनांना यांचाही कुशलतेनं उपयोग करता आला पाहिजे.—नीति. २२:२९.

२. शिष्य बनवण्यासाठी आपण सहसा कोणकोणत्या साधनांचा उपयोग करतो?

२ आपली नेहमीची शिकवण्याची साधनं: शिकवताना आपण बायबलव्यतिरिक्‍त इतर कोणती साधनं वापरली पाहिजेत? बायबलमधील सत्यं शिकवण्यासाठी आपण प्रामुख्यानं बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा उपयोग करतो. या पुस्तकातून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपण देवाच्या प्रेमात टिकून राहा! या पुस्तकाचा उपयोग करून विद्यार्थ्याला दररोजच्या जीवनात बायबल तत्त्वांचं पालन कसं करायचं ते शिकवतो. म्हणजे, या दोन पुस्तकांचा उपयोग करण्यात आपण एकदम कुशल झालं पाहिजे. इतरांना शिकवताना आपण बाकीचीही माहितीपत्रकं वापरली पाहिजेत. बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकाचा खासकरून उपयोग करू शकतो. पण घरमालक जर ख्रिस्ती नसेल तर आधी आपण तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते या माहितीपत्रकातून अभ्यास सुरू करू शकतो. आणि त्यानंतर मग देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकाचा उपयोग करू शकतो. आपल्या क्षेत्रातील लोक कमी शिकलेले असतील किंवा अशी एखादी भाषा बोलत असतील ज्यात फार कमी किंवा काहीच प्रकाशनं नाहीत तर आपण देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकांचा उपयोग करू शकतो. विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेबद्दलची माहिती देण्याकरता आपण सहसा यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? या माहितीपत्रकाचा उपयोग करतो. शिष्य बनवण्यासाठी, बायबलचा अभ्यास का करावा?, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? आणि देवाला नाव आहे का? यांसारख्या व्हिडिओंचाही उपयोग करायला आपण शिकलं पाहिजे.

३. भविष्यात आपली राज्य सेवा यांमध्ये कोणत्या सूचना मिळतील?

३ आपल्याजवळ असलेल्या प्रकाशनांचा कुशलपणे उपयोग करण्यास आपल्याला मदत करण्याकरता आपली राज्य सेवा यांमध्ये भविष्यात काही सूचना मिळतील. आपण या साधनांचा कुशलपणे उपयोग करायला शिकलो तर देवाच्या प्रेरणेनं देण्यात आलेल्या सल्ल्याचं आपण पालन करू: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेही तारण साधशील.”—१ तीम. ४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा