मे ४ च्या सप्ताहाचा आराखडा
४ मे पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ४९ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल १-३ (८ मि.)
क्र. १: २ शमुवेल २:२४-३२ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बथशेबा—विषय: पश्चात्ताप करणाऱ्यांना देवाची मर्जी प्राप्त होऊ शकते—२शमु ११:१–१२:२५; १राजे १:५-३७; २:१३-२५ (५ मि.)
क्र. ३: लवकरच पूर्ण होणाऱ्या बायबलमधील भविष्यवाण्या—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १६ परि. ४–पृ. १७ परि. १ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सुज्ञ लोकांप्रमाणं “वेळेचा सदुपयोग करा.”—इफिस. ५:१५, १६.
१० मि: मंडळीच्या गरजा. नमुना सादरीकरणाचा वापर करून प्रात्यक्षिक दाखवलं जाऊ शकतं.
५ मि: मे आणि जून महिन्याची साहित्य सादरता. चर्चा. जी साहित्ये सादर केली जाणार आहेत त्यांची वैशिष्ट्ये सांगा. एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: कमी वेळा कार्य केलेल्या क्षेत्रात प्रचार करून वेळेचा सदुपयोग करा. वडिलांद्वारे चर्चा; शक्यतो असे वडील ज्यांनी मागील सेवा वर्षाच्या खास मोहिमेदरम्यान अशा क्षेत्रात कार्य केलं आहे. विटनेसिंग इन आयसोलेटेड टेरेटरी—ऑस्ट्रेलिया हा व्हिडिओ दाखवा. (jw.org या वेबसाईटवर ABOUT US > ACTIVITIES या टॅबखाली पाहा.) कमी वेळा कार्य केलेल्या क्षेत्रात जाऊन प्रचार कार्य केल्यामुळं व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या कुटुंबावर काय परिणाम झाला त्यावर चर्चा करा. अशा प्रचारकांची मुलाखत घ्या ज्यांनी मागील सेवा वर्षाच्या खास मोहिमेदरम्यान कधीतरी कार्य केलेल्या क्षेत्रात प्रचार केला. यामुळं त्यांच्या कुटुंबावर, सेवाकार्यावर आणि आध्यात्मिकतेवर कोणते चांगले परिणाम झाले आहेत? त्यांनी कोणत्या योजना केल्या होत्या? ज्यांना अशा क्षेत्रात जाऊन प्रचार कार्य करण्याची इच्छा आहे त्यांना मदत करण्यास वडिलांना नक्कीच आनंद होईल. क्वचित कार्य झालेल्या क्षेत्रात प्रचार कार्य करून वेळेचा सदुपयोग होतो यावर भर द्या.
गीत २९ आणि प्रार्थना