सेवाकार्यात देवाच्या वचनातील सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करा
आपण सांगत असलेली सुवार्ता कुणी लक्ष देऊन ऐकतं तेव्हा आपण लगेच त्या संधीचा उपयोग करून त्या व्यक्तीला थेट बायबलमधून वचनं वाचून दाखवतो. यामुळं देवाच्या वचनातील शक्तीचा तिच्या मनावर प्रभाव पडतो. मागील वर्षाच्या खास संमेलनाच्या दिवशी याच विषयावर जोर देण्यात आला होता. त्या वेळी प्रवासी पर्यवेक्षकांनी दिलेल्या भाषणाचा विषय होता: “सेवाकार्यात देवाच्या वचनातील सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग करा.” तुम्हाला त्यातले काही मुख्य मुद्दे आठवतात का?
आपल्या शब्दांपेक्षा देवाचं वचन सामर्थ्यशाली का आहे?—२ तीम. ३:१६, १७.
देवाचं वचन थेट व्यक्तीच्या भावनांना कसं स्पर्श करतं, विचारसरणीला आकार देतं, हेतू सुधारतं आणि आचरणाला चालना देतं?—टेहळणी बुरूज, १५ जून २०१२, पृ. २७, परि. ७ पाहा.
सेवाकार्यात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला बायबलचं वचन वाचून दाखवतो तेव्हा तिला देवाच्या वचनाविषयी आदर वाटेल अशा रीतीनं तिचं लक्ष कसं वेधू शकतो?—सेवा स्कूल पुस्तक, पृ. १४८, परि. ३-४ आणि आपली राज्य सेवा, मार्च २०१३, पृ. ९, परि. ८ पाहा.
आपण जे वचन वाचतो त्याचं स्पष्टीकरण देणं आणि त्यावर तर्क करणं महत्त्वाचं का आहे? आपण हे कसं करू शकतो?—प्रे. कृत्ये १७:२, ३; सेवा स्कूल पुस्तक, पृ. १५४, परि. ४ ते पृ. १५६, परि. ५ पाहा.
बायबलचा उपयोग कोणत्या वेळी करायचा याबद्दल आपण सावधगिरी कशी बाळगू शकतो?—मत्त. १०:१६; आपली राज्य सेवा, एप्रिल २००८, पृ. ५ पाहा.