वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१५ पृ. ३
  • एक खास आमंत्रण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक खास आमंत्रण
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • एक खास निमंत्रण
    आमची राज्य सेवा—२०१४
  • एक परिणामकारक मोहीम
    आमची राज्य सेवा—२०१३
  • एप्रिल २ पासून स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिकेचे वाटप
    आमची राज्य सेवा—२०११
  • स्मारकविधी जाहिरात मोहीम १ मार्चपासून सुरू
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km ७/१५ पृ. ३

एक खास आमंत्रण

१. अधिवेशनाची आमंत्रणपत्रिका देण्यास आपण केव्हा सुरू करणार आहोत?

१ समजा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा मित्रजनांसाठी मेजवानीचा बेत केला आहे. यासाठी तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे आणि खर्चही केला आहे. आणि आता जेव्हा तुम्ही या मेजवानीचं आमंत्रण त्यांना द्याल तेव्हा तुम्ही ते अगदी उत्साहानं द्याल. तसंच, येणाऱ्‍या अधिवेशनात सादर केल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक मेजवानीसाठी बरीच मेहनत घेण्यात आली आहे. अधिवेशन सुरू व्हायच्या तीन आठवड्यांआधी आपण याची आमंत्रणपत्रिका द्यायला सुरू करणार आहोत. हे काम आपण उत्साहानं कसं करू शकतो?

२. कोणकोणत्या कारणांसाठी आपण मोहिमेत पूर्ण उत्साहानं भाग घेऊ?

२ अधिवेशनांत यहोवा आपल्याला देत असलेल्या मार्गदर्शनामुळं आपल्याला वैयक्‍तिक रीत्या किती फायदा होतो यावर मनन केल्यास आपण या मोहिमेत उत्साहानं भाग घेऊ. (यश. ६५:१३, १४) दर वर्षी होणाऱ्‍या या मोहिमांचे चांगले परिणाम होतात. (“चांगले परिणाम” ही चौकट पाहा.) आपण ज्यांना आमंत्रणपत्रिका देतो ते सर्वच अधिवेशनाला येणार नाहीत. पण काही लोक आले नाहीत तरीसुद्धा, मोहिमेदरम्यान आपण घेतलेल्या परिश्रमांमुळं यहोवाची स्तुती होते आणि तो किती उदार आहे हे दिसून येतं.—स्तो. १४५:३, ७; प्रकटी. २२:१७.

३. आमंत्रणपत्रिकांचं वाटप करताना वडील जन कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतील?

३ प्रत्येक मंडळीतील वडिलांनी, होता होईल तितक्या आमंत्रणपत्रिका कशा देता येतील यावर विचार करावा. बंद असलेल्या घरी किंवा सार्वजनिक साक्षकार्य करताना लोकांना आमंत्रणपत्रिका द्यायच्या किंवा नाही यावरही त्यांनी विचार करावा. शनिवार-रविवारी आमंत्रणपत्रिका देताना, उचित असेल तर नियतकालिकंही दिली जाऊ शकतात. मोहीम संपल्यानंतर आपल्या सर्वांना दोन गोष्टींचा आनंद होईल. पहिली गोष्ट, आपण उत्साहानं आमंत्रणपत्रिकेच्या वाटपात भाग घेतला होता आणि दुसरी, यहोवानं तयार केलेल्या मेजवानीला बरेच लोक आले होते!

कशी द्याल पत्रिका:

नमस्ते म्हटल्यानंतर, तुम्ही म्हणू शकता: “एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आमंत्रणपत्रिकेच्या मोहिमेत आम्ही भाग घेत आहोत. ही मोहीम संपूर्ण जगभर राबवली जात आहे. या पत्रिकेच्या मागच्या पानावर तुम्हाला अधिवेशनाची तारीख, वेळ आणि पत्ता पाहायला मिळेल.”

चांगले परिणाम

  • खूप वर्षांआधी, आमंत्रणपत्रिकेच्या मोहिमेत भाग घेत असताना एका बहिणीच्या मनात सहज एक विचार आला, की ‘आपण इतका प्रयत्न करत आहोत, पण याचा काही फायदा होतोय का? लोक खरंच येतील का अधिवेशनाला?’ मग अधिवेशनात शनिवारी सकाळी तिनं एका शीख गृहस्थाला बसलेलं पाहिलं. ती त्याला भेटायला गेली. तेव्हा त्यानं तिला सांगितलं, की कुणीतरी त्याला अधिवेशनाचं आमंत्रण दिलं होतं म्हणून तो आला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्‍न होते. बहिणीनं त्याला त्यांची उत्तरं दिली. त्यानं म्हटलं, की त्याला कार्यक्रम खूप आवडला आणि विशेष म्हणजे तिथं आलेल्या सर्वांचा पेहराव पाहून तो खूप प्रभावित झाला. त्याच दिवशी, ही बहीण तिच्या शेजारी बसलेल्या एका जोडप्याशी बोलू लागली. त्यांनापण कुणीतरी आमंत्रण दिलं होतं आणि ते बसनं प्रवास करून आले होते. त्यांनी तिला सांगितलं, की त्यांनाही कार्यक्रम खूप आवडला व ते रविवारीसुद्धा येणार आहेत. या दोन अनुभवांनंतर आपल्या बहिणीला जाणवलं, की दर वर्षी होणारी ही मोहीम खरोखर महत्त्वाची आहे.

  • अलिकडंच झालेल्या एका अधिवेशनात सामान्य पायनियर असलेलं एक जोडपं, एका वयोवृद्ध जोडप्याला भेटलं. या जोडप्यानं त्यांना सांगितलं, की ते पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अधिवेशनाला आले होते. पायनियर जोडप्यानं त्यांना विचारलं: “तुम्हाला आमंत्रणपत्रिका कुणी दिली?” ते म्हणाले: “आम्ही बाहेर गेलो होतो, घरी आल्यावर आम्ही पाहिलं की कुणीतरी दाराखालून पत्रिका आत सरकवली होती.” त्यांनी पत्रिकेवरील मजकूर वाचला आणि पत्रिकेच्या मागे असलेलं कूपन भरलं. अधिवेशनाच्या मधल्या सुटीत आपल्या बांधवांनी त्यांना जेवणसुद्धा दिलं. ते म्हणाले, की त्यांना कार्यक्रम इतका आवडला होता की ते दुसऱ्‍या दिवशीही येतील. या जोडप्याची आवड वाढवण्यासाठी त्यांची भेट घेण्याची व्यवस्था करण्यात आली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा