वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१४ पृ. ३-४
  • एक खास निमंत्रण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक खास निमंत्रण
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • एक खास आमंत्रण
    आपली राज्य सेवा—२०१५
  • स्मारकविधी जाहिरात मोहीम १ मार्चपासून सुरू
    आमची राज्य सेवा—२०१३
  • स्मारकविधीचे आमंत्रण देण्याची मोहीम २२ मार्चपासून सुरू होईल
    आमची राज्य सेवा—२०१४
  • एप्रिल २ पासून स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिकेचे वाटप
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ७/१४ पृ. ३-४

एक खास निमंत्रण

१. सन २०१४ च्या अधिवेशनाची निमंत्रण मोहीम आपण केव्हा सुरू करू?

१ अशी कल्पना करा, की तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबाला खास जेवणाला बोलवण्याचा विचार करत आहात. त्यासाठी तुम्ही बरीच मेहनत व खर्च करणार आहात. साहजिकच तुम्ही मोठ्या उत्साहाने त्यांना त्याचे आमंत्रण द्याल. त्याचप्रमाणे, २०१४ च्या प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनात दिल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक मेजवानीसाठीही खूप मेहनत घेण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तीन आठवड्यांआधी लोकांना त्याचे निमंत्रण देण्याचा सुहक्क आपल्याला असेल. कोणती गोष्ट आपल्याला आवेशाने निमंत्रण देण्यास मदत करेल?

२. कोणत्या गोष्टीमुळे निमंत्रण मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घेण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल?

२ अधिवेशनांत यहोवा पुरवत असलेल्या आध्यात्मिक मेजवानीचा आपल्याला व्यक्‍तिगतपणे किती फायदा होतो याचा कृतज्ञ अंतःकरणाने विचार केल्यास या निमंत्रण मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घेण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. (यश. ६५:१३, १४) आपल्या वार्षिक मोहिमेमुळे सहसा चांगलेच परिणाम घडून येतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण ज्यांना निमंत्रण देतो त्यांपैकी काही जण अधिवेशनाला उपस्थित राहतील. निमंत्रण दिलेले सर्वच जण उपस्थित राहिले नाही, तरी मोहिमेदरम्यान आपण जी मेहनत घेऊ त्यामुळे यहोवाचा गौरव होईल आणि त्याचा उदारपणा दिसून येईल.—स्तो. १४५:३, ७; प्रकटी. २२:१७.

३. निमंत्रणपत्रिका कशा दिल्या जातील?

३ जास्तीत जास्त लोकांना निमंत्रणपत्रिका कशा देता येतील हे प्रत्येक मंडळीच्या वडील वर्गाने ठरवले पाहिजे. तसेच, बंद असलेल्या घरांत किंवा मंडळीच्या क्षेत्रात सार्वजनिक साक्षकार्यामध्ये पत्रिका द्याव्यात की नाही हेसुद्धा त्यांनी ठरवावे. शक्य आहे तेथे शनिवारी-रविवारी निमंत्रणपत्रिकेसोबत नियतकालिकेही दिली जावीत. महिन्याचा पहिला शनिवार मोहिमेदरम्यानच्या काळात येत असेल तर बायबल अभ्यास सुरू करण्याऐवजी निमंत्रणपत्रिका द्याव्यात. शेवटी, मोहीम संपल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा आनंद होईल की आपण त्यात उत्साहाने सहभाग घेतला आणि शक्य तितक्या लोकांना निमंत्रण दिले.

[३ पानांवरील चित्र]

तुम्ही काय म्हणू शकता:

नमस्ते म्हटल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता: “आज जगभरात सर्व लोकांना एका खास कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जात आहे. तेच निमंत्रण आम्ही तुम्हालाही देऊ इच्छितो. कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि पत्ता त्यात दिला आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा