सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नियतकालिक मार्ग सुरू करा
हे का महत्त्वाचं: अनेक लोकांना फक्त आपली नियतकालिकं वाचायला आवडतात; आपल्याबरोबर बायबलचा अभ्यास करायला त्यांना आवडत नाही. त्यांना कदाचित त्यांच्या धर्मात समाधान वाटत असेल किंवा त्यांच्याकडं अभ्यासासाठी वेळ नसेल. पण आपली नियतकालिकं वाचता-वाचता त्यांच्या मनात बायबलबद्दल आवड निर्माण होऊ शकते. (१ पेत्र २:२, ३) नियतकालिकांतला एखादा लेख त्यांच्या मनाला स्पर्श करेल किंवा त्यांच्या जीवनात काहीतरी घडल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलेल. आपण नियमित रीत्या त्यांना भेटायला जात राहिलो तर आपल्याशी त्यांची ओळख वाढेल. हळूहळू आपल्याला, त्यांना कोणत्या गोष्टींत आवड आहे, कोणत्या चिंता आहेत हे कळेल. मग असं करता करता बायबलचा अभ्यास सुरू होऊ शकतो.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
तुम्ही ज्यांच्यासोबत नियतकालिक मार्ग सुरू करू शकता त्यांची यादी करा. त्यांना नवीन अंक द्या आणि मी पुढील अंक तुमच्यासाठी आणेन, असं त्यांना सांगा.