स्मारकविधीची तुम्ही तयारी करत आहात का?
तारीख होती इ.स. ३३ निसान १३. मृत्यूदंड मिळण्यापूर्वी आपल्या जवळच्या शिष्यांबरोबर वेळ घालवण्यासाठी आपल्याजवळ फक्त एकच संध्याकाळ हाताशी आहे, हे येशूला माहीत होतं. त्यांच्याबरोबर शेवटला वल्हांडण सण साजरा केल्यानंतर, तो ‘प्रभूचं सांज भोजन’ या एका नव्या समारंभाची स्थापना करणार होता. हा खूपच महत्त्वाचा प्रसंग असल्यामुळं त्याची आधी तयारी करणं आवश्यक होतं. त्यामुळं तो पेत्र आणि योहान यांना या समारंभाची तयारी करण्यासाठी पाठवून देतो. (लूक २२:७-१३) तेव्हापासून दर वर्षी स्मारकविधी साजरा करणारे ख्रिस्ती या प्रसंगाची जोरदार तयारी करतात. (लूक २२:१९) या वर्षी ३ एप्रिल रोजी स्मारकविधी होणार आहे. तेव्हा, कोणकोणत्या गोष्टींची, म्हणजे अगदी बारीकसारीक गोष्टींचीही आपण तयारी केली पाहिजे?
प्रचारकांनी काय तयारी करावी:
आमंत्रण पत्रिकेच्या वाटप मोहिमेत पुरेपूर भाग घ्यावा.
तुमचे बायबल विद्यार्थी, नातेवाईक, शाळासोबती, सोबत काम करणारे व इतर ओळखीच्या लोकांची यादी करून त्यांना पत्रिका द्याव्यात.
स्मारकविधीच्या काळात असलेलं बायबल वाचन करून त्यांवर मनन करावं.
स्मारकविधीच्या दिवशी पाहुण्यांचं स्वागत करायला सभागृहात लवकर यावं.