मार्च ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४९ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ४० (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ शमुवेल १-४ (८ मि.)
क्र. १: १ शमुवेल २:३०-३६ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बायबलमध्ये मशीहाबद्दल कोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १० (५ मि.)
क्र. ३: आसा—विषय: खऱ्या उपासनेसाठी आवेशी असा—२इति १४:१-१५; १५:१-१५ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.”—तीत ३:१.
१० मि: “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.” महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. नीतिसूत्रे २१:५; तीत ३:१ आणि १ पेत्र ३:१५ वाचा आणि चर्चा करा. चांगली तयारी केल्यानं आपल्याला फायदा कसा होतो ते समजावून सांगा. महिन्याच्या सेवा सभेत कोणत्या भागांची चर्चा केली जाणार आहे त्यावर थोडक्यात बोला आणि त्या भागांचा महिन्याच्या मुख्य विषयाशी कसा संबंध आहे त्याची चर्चा करा.
१० मि: ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकांची मुलाखत. तुमच्या जबाबदारीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? प्रत्येक आठवड्याची प्रशाला घेण्यासाठी तुम्ही तयारी कशी करता? विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणाची चांगल्या प्रकारे तयारी केली पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? सभेला येण्याआधी सर्व जण सभांमध्ये चर्चा केली जाणारी माहिती वाचून आले तर त्यांचा काय फायदा होईल?
१० मि: “स्मारकविधीची तुम्ही तयारी करत आहात का?” चर्चा. आपली राज्य सेवा मार्च २०१३ पृष्ठ २ वरील माहितीची थोडक्यात उजळणी करा. एक प्रचारक स्मारकविधीला आलेल्या व्यक्तीचं स्वागत करत असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ८ आणि प्रार्थना