क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
ऑगस्ट २०१४
तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल, की नियमन मंडळानं ठरवल्याप्रमाणं ऑगस्ट महिन्यातली खास मोहीम ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी मोहीम ठरली. या महिन्यात २०,३१४ प्रचारक, २०,६९७ सामान्य व साहाय्यक पायनियर आणि २९९ खास पायनियर या सगळ्यांनी मिळून १,०३,८६,६८१ पत्रिका आणि माहितीपत्रकं लोकांना दिली. वार्षिक अहवालावरून दिसून येतं, की गेल्या सेवा वर्षात प्रचारकांच्या संख्येत ७ टक्के वाढ झाली. तसंच, प्रचारक व पायनियर यांनी मिळून ४१,३१० चा नवीन उच्चांक गाठला. पण, या मोठ्या देशात अजूनही बरंच काम करायचं बाकी आहे. “यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”—मत्तय ९:३८.