नोव्हेंबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा
२४ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा २१, २२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद २८-३१ (१० मि.)
क्र. १: अनुवाद ३०:१५-३१:८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सर्व धर्मांत चांगले आहे हे खरे नाही—बायबल विषय ३७ख (५ मि.)
क्र. ३: तांबडा समुद्र ओलांडणं—बायबल कथा ३३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१४ मि: “पायनियर सेवा—तुम्ही करू शकाल का?” या लेखातील परिच्छेद २२-३२ वर सेवा पर्यवेक्षकांनी चर्चा करावी.
८ मि: “मला पुन्हा तो घरी भेटलाच नाही!” चर्चा. घरमालक पुन्हा घरी भेटत नसला तरी त्याला भेटण्याचा सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे का आहे यावर चर्चा करा.—मत्त. २८:१९, २०; मार्क ४:१४, १५; १ करिंथ. ३:६.
८ मि: “नवीन संशोधन साधन.” भाषण. संशोधन मार्गदर्शक याच्या प्रस्तावनेत “एखाद्या विषयावर माहिती कशी शोधावी?” येथे दिलेल्या सूचनांची उजळणी करा. या नवीन साधनाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधा. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी बायबलमध्ये काय मार्गदर्शन दिले आहे ते पाहण्यासाठी एक प्रचारक संशोधन मार्गदर्शक वापरत आहे असे एक स्वगत थोडक्यात दाखवा.
गीत ११ आणि प्रार्थना