सप्टेंबर २२ च्या सप्ताहाचा आराखडा
२२ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ६ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा १० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना ३०-३२ (१० मि.)
क्र. १: गणना ३२:१६-३० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: नरक—अग्नियातनांचे खरोखरचे ठिकाण नाही—बायबल विषय १५क (५ मि.)
क्र. ३: तान्हा मोशे कसा वाचला—बायबल कथा २८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: तुमच्यामध्ये जे श्रम घेत आहेत त्यांना मान द्या. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) पुढील प्रश्नांवर आधारित चर्चा: (१) ख्रिस्ती वडील मंडळीत कोणकोणत्या मार्गांनी श्रम घेतात? (२) आपण त्यांचा भार कसा हलका करू शकतो? (३) जे पुढाकार घेतात त्यांनाही प्रोत्साहनाची गरज का असते? (४) आपण ख्रिस्ती वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन कसे देऊ शकतो? (५) मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहिल्याने मंडळीला आणि वडिलांनाही फायदा कसा होऊ शकतो?
१५ मि: “सेवाकार्यात jw.org या वेबसाईटचा वापर करा.” चर्चा. परिच्छेद २ मध्ये जे उदाहरण दिले आहे त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर श्रोत्यांना पुढील प्रश्न विचारा: आपल्या मोबाईलवर किंवा टॅबवर व्हिडिओ डाउनलोड केल्याने कोणता फायदा होऊ शकतो? खूप लांबलचक प्रस्तावना देण्याऐवजी किंवा घरमालकाची परवानगी घेण्याऐवजी थेटपणे व्हिडिओ प्ले करणे सहसा चांगले का आहे? सेवाकार्यात व्हिडिओचा वापर केल्यामुळे तुम्हाला कोणते चांगले अनुभव आले आहेत? चर्चेच्या शेवटी प्रचारकांना, jw.org या वेबसाईटच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांशी परिचित होऊन सेवाकार्यात तिचा वापर करण्याचे प्रोत्साहन द्या.
गीत २५ आणि प्रार्थना