सप्टेंबर ८ च्या सप्ताहाचा आराखडा
८ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ७ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना २२-२५ (१० मि.)
क्र. १: गणना २२:३६–२३:१० (४ मि. किंवा कमी)
क्र. २: अन्य भाषेत बोलणे केवळ एक तात्पुरती तरतूद होती—बायबल विषय २२घ (५ मि.)
क्र. ३: एक दुष्ट राजा इजिप्तवर राज्य करतो—बायबल कथा २७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: प्रचार कार्य करताना सभ्यपणा दाखवा. (२ करिंथ. ६:३) पुढील प्रश्नांवर आधारित चर्चा: (१) प्रचार करताना सभ्यपणा दाखवणे महत्त्वाचे का आहे? (२) पुढील परिस्थितींत आपण सभ्यपणा कसा दाखवू शकतो? (क) आपण क्षेत्रात एकत्र येतो तेव्हा, (ख) एका घरापासून दुसऱ्या घराकडे पायी जाताना किंवा ग्रामीण भागात गाडीतून जाताना, (ग) दारात उभे असताना, (घ) आपला सोबती साक्ष देत असताना, (च) घरमालक बोलत असताना, (छ) घरमालक कामात असेल किंवा हवामान बरोबर नसेल तेव्हा, (ज) घरमालक रागात असतो तेव्हा.
१० मि: अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करू शकाल का? आपली राज्य सेवा जुलै २००१, पृष्ठ ८ वरील लेखावर आधारित सेवा पर्यवेक्षकाचे भाषण. शक्य असल्यास अशा एका पायनियरची मुलाखत घ्या ज्याने आपली सेवा वाढवली आहे किंवा सेवा वाढवण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे.
१० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीकरता पाया घाला.” चर्चा. एक स्वगत दाखवा ज्यात प्रचारक सेवाकार्यात जाण्याची तयारी करतो आणि घरमालकाने नियतकालिक घेतल्यास पुनर्भेटीसाठी त्याला कोणता प्रश्न विचारता येईल हे ठरवतो.
गीत ३८ आणि प्रार्थना