सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीकरता पाया घाला
हे का महत्त्वाचे: घरमालकाने संदेशात आवड दाखवल्यास, त्याच्या मनात जे सत्याचे बी आपण पेरले आहे त्याला पाणी घालता यावे म्हणून त्याची पुनर्भेट घेणे गरजेचे आहे. (१ करिंथ. ३:६) पण यासाठी पहिल्या भेटीतच, तो पुढच्या वेळी घरी कधी भेटेल हे जाणून त्याची भेट घेण्याची योजना केली पाहिजे. तसेच, आपण कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत हेही त्याला सांगणे चांगले आहे. यामुळे तो पुढच्या भेटीची आतुरतेने वाट पाहील. आणि आपण दिलेल्या प्रकाशनात जर त्या प्रश्नाचे उत्तर असेल, तर तो कदाचित ते प्रकाशनही वाचेल. पुनर्भेटीचा पाया अशा प्रकारे घातल्यास पुनर्भेट घेणे आपल्याला जास्त सोपे जाईल. कारण, आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत हे आधीच ठरवलेले असेल आणि घरमालकालाही याची कल्पना असेल. पुनर्भेट घ्यायला गेल्यावर आपण त्याला सांगू शकतो की पहिल्या भेटीदरम्यान जो प्रश्न विचारला होता त्याचेच उत्तर देण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यानंतर, पुढे चर्चा चालू ठेवता येईल.
हे कसे करावे:
• घरोघरच्या प्रचार कार्याची प्रस्तावना तयार करतानाच पुनर्भेटीकरता कोणता प्रश्न विचारता येईल याची तयारी करा. तो प्रश्न, त्या दिवशी तुम्ही जे प्रकाशन देणार आहात त्यातील एखाद्या विषयावर किंवा बायबल अभ्यासाच्या प्रकाशनातील एखाद्या प्रश्नावर आधारित असू शकतो. हे प्रकाशन पुनर्भेट घेताना तुम्ही घरमालकाला देऊ शकता.
• घरमालकाला पुन्हा भेटायला तुम्हाला आवडेल हे संभाषण संपवताना त्याला सांगा आणि तयार केलेला प्रश्न विचारा. काही क्षेत्रातील लोक खूप व्यस्त असतात आणि पुन्हा भेटण्यासाठी वेळ द्यायला सहसा मागेपुढे पाहतात. तुमच्या क्षेत्रातील लोक असे असतील तर तुम्ही त्यांना म्हणू शकता: “. . . या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी पुढच्या आठवड्यात थोडा वेळ तुमच्याकडं आलो तर चालेल का? तुम्ही सहसा याच वेळी घरी असता का? [उत्तरासाठी थांबा.] पण, त्या वेळी तुम्ही खूप कामात असाल तर तसं मला सांगू शकता.”
• तुम्ही पुनर्भेटीसाठी घरमालकाला अमुक एक वेळ दिली असल्यास, त्याच वेळी जा. (मत्त. ५:३७) पुनर्भेट संपवताना पुढच्या भेटीकरता पाया घाला.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
• प्रस्तावना तयार करताना पुनर्भेटीकरता कोणता प्रश्न विचारता येईल याची तयारी करा. आणि ज्या वेगवेगळ्या प्रचारकांसोबत तुम्ही काम कराल त्यांनाही याबद्दल सांगा.