संदेष्ट्यांचे अनुकरण करा—सफन्या
१. सफन्याने कोणत्या परिस्थितीत संदेष्टा म्हणून सेवा केली, आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?
१ इ.स.पू. सातव्या शतकाच्या मधल्या काळात यहूदामध्ये बआल दैवताची उघडपणे उपासना केली जात होती. दुष्ट राजा आमोन याचा अलीकडेच खून करण्यात आला होता. आणि आता त्याच्या जागी तरुण योशीया राज्य करू लागला होता. (२ इति. ३३:२१–३४:१) त्या वेळी, यहोवाने त्याच्या न्यायदंडाचा संदेश घोषित करण्यासाठी सफन्याला नियुक्त केले. तो यहुदाच्या राजघराण्याचा एक सदस्य होता. असे असले, तरी यहूदा राज्यात पुढाकार घेणाऱ्यांबद्दल यहोवाने जो निषेध व्यक्त केला होता तो त्याने जसाच्या तसा कळवला. (सफ. १:१; ३:१-४) सफन्याप्रमाणे आपणही धैर्य दाखवले पाहिजे. तसेच, यहोवाच्या उपासनेच्या आड आपले नातेवाईक येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. (मत्त. १०:३४-३७) सफन्याचा संदेश काय होता आणि त्याच्या संदेशाचा काय परिणाम झाला?
२. यहोवाच्या क्रोधाच्या दिवसातून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
२ यहोवामध्ये आश्रय घ्या: केवळ यहोवाच एका व्यक्तीला त्याच्या क्रोधाच्या दिवसातून वाचवू शकतो. त्यामुळेच, सफन्याने यहूदातील लोकांना उरलेल्या वेळात यहोवामध्ये आश्रय घेण्यास आणि धार्मिकतेचा व नम्रतेचा अवलंब करण्यास आर्जवले. (सफ. २:२, ३) आज आपल्या दिवसांतही जो काही वेळ उरला आहे त्यात आपण सफन्याप्रमाणे इतरांना यहोवामध्ये आश्रय घेण्याचे प्रोत्साहन देतो. पण असे करत असताना आपण स्वतःदेखील “यहोवाचे अनुसरण करण्यापासून मागे” न फिरण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे. (सफ. १:६, पं.र.भा.) त्यासाठी आपण यहोवामध्ये आश्रय घेतला पाहिजे आणि धार्मिकतेचा व नम्रतेचा अवलंब केला पाहिजे. बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याद्वारे व मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे आपण त्याच्यामध्ये आश्रय घेतो. आपण नैतिक रीत्या शुद्ध जीवन जगतो तेव्हा आपण धार्मिकतेचा अवलंब करतो. आणि शेवटी, आपण अधीनतेचा गुण विकसित करतो व यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचे लगेच पालन करतो तेव्हा नम्रतेचा अवलंब करतो.
३. सेवाकार्यात आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन का बाळगला पाहिजे?
३ सकारात्मक परिणाम: सफन्याने घोषित केलेला न्यायदंडाचा संदेश ऐकून यहूदातील काहींच्या मनावर आणि विशेषकरून तरुण योशीयाच्या मनावर चांगला परिणाम झाला. कोवळ्या वयापासूनच तो यहोवामध्ये आश्रय घेऊ लागला. पुढे त्याने देशातून मूर्तिपूजा काढून टाकण्यासाठी एक जोरदार मोहीम राबवली. (२ इति. ३४:२-५) आज प्रचार कार्य करताना राज्याचे काही बी वाटेवर, खडकाळ जमिनीवर किंवा काटेरी झाडांमध्ये पडत असले, तरी काही बी चांगल्या जमिनीवर पडतात व फळ देतात. (मत्त. १३:१८-२३) राज्याचे बी पेरण्याच्या कामात आपण व्यस्त राहिलो तर यहोवा आपले प्रयत्न आशीर्वादित करेल असा भरवसा आपण बाळगू शकतो.—स्तो. १२६:६.
४. आपण यहोवाची वाट का पाहावी?
४ यहूदातील काही लोकांना वाटले की यहोवा कोणतेही पाऊल उचलणार नाही. पण, खुद्द यहोवाने याची खातरी दिली होती की त्याचा मोठा दिवस जवळ आहे. (सफ. १:१२, १४) ज्यांनी यहोवामध्ये आश्रय घेतला होता केवळ त्यांचाच बचाव होणार होता. (सफ. ३:१२, १७) आपला महान देव यहोवा याची वाट पाहत असताना आपण त्याच्या उपासकांसोबत ऐक्याने व आनंदाने सेवा करत राहू या.—सफ. ३:८, ९.