जुलै २८ च्या सप्ताहाचा आराखडा
२८ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
यहोवाची इच्छा पाठ २०-२२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना १-३ (१० मि.)
क्र. १: गणना ३:२१-३८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: पृथ्वी पुन्हा नष्ट होणार नाही किंवा निर्जन होणार नाही—बायबल विषय २०ख (५ मि.)
क्र. ३: फारोची स्वप्नं—बायबल कथा २३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: ऑगस्ट महिन्यात तुम्ही साहाय्यक पायनियरिंग करणार का? भाषण. आजारी किंवा व्यस्त असतानादेखील जे ऑगस्ट महिन्यात साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करण्याचे ठरवत आहेत अशा दोन किंवा तीन प्रचारकांची मुलाखत घ्या. साहाय्यक पायनियरिंग करता यावी म्हणून ते कोणते फेरबदल करत आहेत हे त्यांना विचार. ऑगस्ट महिन्यादरम्यान क्षेत्र सेवा सभा चालवण्यासाठी ज्या योजना केल्या आहेत त्या सेवा पर्यवेक्षकाला विचारा.
१० मि: मंडळीच्या सचिवाची मुलाखत घ्या. तुम्हाला तुमची नेमणूक पूर्ण करण्यासाठी काय करावे लागते? मंडळीचा सेवा अहवाल अचूकपणे व वेळेवर तयार करण्यासाठी गट पर्यवेक्षक आणि प्रचारक तुम्हाला मदत कशी करू शकतात? अचूक अहवालामुळे वडिलांना, विभागीय पर्यवेक्षकांना व शाखा कार्यालयातील बांधवांना आवश्यक प्रोत्साहन देण्यास कशी मदत होते?
१० मि: “संदेष्ट्यांचे अनुकरण करा—सफन्या.” प्रश्न व उत्तरे.
गीत ४२ आणि प्रार्थना