वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१४ पृ. ९
  • नवीन पत्रिका आकर्षक रूपात!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन पत्रिका आकर्षक रूपात!
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • आज आमच्या सेवा कार्यात पत्रिका इतक्या मौल्यवान का आहेत
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ४/१४ पृ. ९

नवीन पत्रिका आकर्षक रूपात!

१. सेवाकार्यात लोकांना देण्यासाठी आकर्षक रूपात उपलब्ध असलेली प्रकाशने कोणती आहेत?

१ “देवाचे वचन हेच सत्य आहे!” या २०१३ च्या प्रांतीय अधिवेशनात पाच नवीन पत्रिका प्रकाशित करण्यात आल्या होत्या. यांच्या जोडीला आता आणखी एक पत्रिका प्रकाशित करण्यात आली आहे. ती म्हणजे राज्य वार्ता क्र. ३८, जिचा विषय आहे: “मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?” या सर्व पत्रिका आकर्षक, नव्या रूपात बनवल्या गेल्या आहेत. या नव्या रूपाची कारणे काय आहेत? घरोघरच्या कार्यात ती सादर करताना त्यांतील वैशिष्ट्यांचा आपण चांगला वापर कसा करू शकतो?

२. पत्रिकांच्या नव्या रूपाचा उद्देश काय आहे?

२ नव्या रूपाचा उद्देश काय?: परिणामकारक सादरीकरणांसाठी सहसा चार गोष्टी आवश्‍यक असतात: (१) संभाषण सुरू करण्यासाठी घरमालकाला विचार करण्यास प्रवृत्त करेल असा प्रश्‍न विचारणे. (२) बायबल त्याविषयी काय म्हणते ते दाखवणे. (३) घरमालकाला वाचण्यासाठी एखादे प्रकाशन देणे. (४) पुनर्भेट घेण्याच्या उद्देशाने एक प्रश्‍न विचारणे; आणि मग परत जाण्याची योजना करणे. पत्रिकांच्या नव्या रूपामुळे या चारही गोष्टी अगदी सहज रीत्या करण्यास मदत मिळते.

३. आपण सेवाकार्यात या पत्रिका कशा सादर करू शकतो?

३ त्यांचा वापर कसा करावा: (१) अभिवादन केल्यानंतर पत्रिकेच्या सुरुवातीला दिलेल्या प्रश्‍नाकडे घरमालकाचे लक्ष वेधा आणि त्याचे मत जाणून घ्या. (२) पत्रिका उघडा व “पवित्र शास्त्र असे शिकवते” याखाली दिलेल्या माहितीची चर्चा करा. परिस्थिती अनुमती देत असल्यास थेट बायबलमधून ते वचन वाचा. घरमालकाजवळ वेळ असेल तर “वरील शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?” यावर चर्चा करा. (३) पत्रिका सादर करा, आणि उरलेली माहिती घरमालकाला त्याच्या फावल्या वेळात वाचण्याचे प्रोत्साहन द्या. (४) तिथून निघण्याआधी घरमालकाला पत्रिकेच्या शेवटल्या पानावर “थोडा विचार करा” याखाली असलेला प्रश्‍न दाखवा आणि बायबलमधून त्याचे उत्तर देण्यासाठी पुनर्भेट घेण्याची योजना करा.

४. पुनर्भेट घेताना आपण नवीन पत्रिकांचा उपयोग कसा करू शकतो?

४ पुनर्भेट घेणेदेखील सोपे आहे. मागच्या भेटीदरम्यान तुम्ही त्याला पत्रिकेच्या शेवटच्या पानावर असलेला जो प्रश्‍न विचारला होता त्याचे उत्तर देण्यासाठी त्या प्रश्‍नाखालीच असलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करा. निघण्याआधी पत्रिकेवर आनंदाची बातमी या माहितीपत्रकाचे जे चित्र दिले आहे त्याकडे घरमालकाचे लक्ष वेधा. त्याला ते माहितीपत्रक दाखवा आणि त्या विषयाशी संबंधित अधिक माहिती देणारा पाठ दाखवा व माहितीपत्रक सादर करा. घरमालकाने माहितीपत्रक घेतल्यास, पुढच्या भेटीत त्यातून चर्चा करण्याची योजना करा. अशा प्रकारे तुम्ही एक बायबल अभ्यास सुरू केला असेल! किंवा माहितीपत्रक सादर करण्याऐवजी तुम्ही या सहा पत्रिकांपैकी एक त्याला देऊ शकता आणि त्यातून चर्चा करण्यासाठी पुन्हा भेट घेण्याची योजना करू शकता.

५. पत्रिकांचे आपल्या सेवाकार्यात काय मोल आहे?

५ मागील १३० पेक्षा जास्त वर्षांपासून सेवाकार्यात पत्रिकांचा वापर केला जात आहे. या पत्रिकांचा आकार व रूप जरी वेगवेगळे असले, तरी साक्ष देण्यासाठी त्या खूप परिणामकारक ठरतात. तर मग, नवीन रूपातील या पत्रिकांचा चांगला वापर करून आपण जगभरात बायबलचे ज्ञान पसरवण्याचा प्रयत्न करत राहू या.—नीति. १५:७क.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा