वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१४ पृ. २-९
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km ४/१४ पृ. २-९

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२८ एप्रिल २०१४ पासून सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल.

१. कोणत्या गोष्टीमुळे योसेफाला पोटीफरच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध न ठेवण्यास मदत मिळाली? (उत्प. ३९:७-१२) [मार्च ३, टेहळणी बुरूज १३ २/१५ पृष्ठ ४ परि. ६; टे.बु. ०७ ११/१ पृष्ठ १० परि. १६]

२. ज्यांना अन्यायाचा व समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी योसेफाच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण का केले पाहिजे? (उत्प. ४१:१४, ३९, ४०) [मार्च १०, टेहळणी बुरूज ०४ १/१५ पृष्ठ २९ परि. ६; टे.बु. ०४ ६/१ पृष्ठ २० परि. ४]

३. योसेफाने कोणत्या आधारावर आपल्या भावांना दया दाखवली? [मार्च १७, टेहळणी बुरूज ९९ १/१ पृष्ठ ३० परि. ६-७]

४. उत्पत्ती ४९:१९ मधील शब्द आज आपल्याला कसे लागू होतात? [मार्च २४, टेहळणी बुरूज ०४ ६/१ पृष्ठे १५-१६ परि. ५-८]

५. निर्गम ३:७-१० या वचनांतून आपल्याला यहोवाविषयी काय शिकायला मिळते? [मार्च ३१, टेहळणी बुरूज ०९ ७/१ पृष्ठ ३२ परि. ३-६]

६. यहोवा मोशेच्या दिवसांत कशा प्रकारे त्याच्या नावाला जागला? (निर्ग. ३:१४, १५) [मार्च ३१, टेहळणी बुरूज १३ ३/१५ पृष्ठे २५-२६ परि. ५-६]

७. निर्गम ७:१ नुसार मोशेला कोणत्या अर्थाने “फारोचा देव” करण्यात आले होते? [एप्रिल ७, टेहळणी बुरूज ०४ ३/१५ पृष्ठ २५ परि. ७]

८. यहोवाने आपल्या सामर्थ्याद्वारे इस्राएली लोकांना इजिप्तच्या दास्यातून मुक्‍त केले असले, तरी नंतर इस्राएली लोकांनी कोणती मनोवृत्ती दाखवली व आपण त्यातून काय शिकू शकतो? (निर्ग. १४:३०, ३१) [एप्रिल १४, टेहळणी बुरूज १२ ३/१५ पृष्ठे २६-२७ परि. ८-१०]

९. नवीनच तयार झालेल्या इस्राएल राष्ट्रासोबत यहोवा अगदी प्रेमळपणे वागला हे, “तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून” या वाक्यांशावरून कसे दिसून येते? (निर्ग. १९:४) [एप्रिल २८, टेहळणी बुरूज ९६ ६/१५ पृष्ठ १० परि. ५-पृष्ठ ११ परि. २]

१०. यहोवा भावी पिढींचे त्यांच्या “वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन” कसे करतो? (निर्ग. २०:५) [एप्रिल २८, टेहळणी बुरूज ०४ ३/१५ पृष्ठ २७ परि. १]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा