स्मारकविधीचे आमंत्रण देण्याची मोहीम २२ मार्च पासून सुरू होईल
या वर्षी लोकांना स्मारकविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्याची मोहीम शनिवार, २२ मार्च पासून सुरू होणार आहे. सर्वांनी यात पुरेपूर भाग घ्यावा असे उत्तेजन आम्ही देत आहोत. शनिवारी व रविवारी, जेथे योग्य राहील तेथे आपण नियतकालिकेदेखील सादर करू शकतो. एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यावर लक्ष देण्याऐवजी आपण आमंत्रणपत्रिका देण्यावर जास्त लक्ष देऊ या. पण, जर कोणी जास्त आवड दाखवली तर आपण त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतो. सार्वजनिक साक्षकार्यात लोकांना आमंत्रणपत्रिका देण्याद्वारे क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल की नाही हे सेवा पर्यवेक्षक ठरवू शकतात. तुम्ही ज्यांना स्मारकविधीला बोलवू इच्छिता त्या नातेवाइकांची, सोबत काम करणाऱ्यांची, शाळासोबत्यांची, आवड दाखवणाऱ्यांची आणि इतर ओळखीच्या लोकांची आताच यादी बनवा आणि जेव्हा मोहीम सुरू होते तेव्हा त्यांना आमंत्रणपत्रिका द्या. यहोवा देवाने व येशूने मानवजातीवर असलेले आपले प्रेम दाखवण्याकरता जे केले त्याचे स्मरण करण्यासाठी आपल्यासोबत इतरही अनेक जण स्मारकविधीला उपस्थित राहतील अशी आपण आशा बाळगू शकतो.—योहा. ३:१६; १५:१३.